श्री शंकराचे पद - हर हर हर हर सुखधामा । योग...
ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.
हर हर हर हर सुखधामा । योगींद्र सुंदर जितकामा ।
सज्जन मुनिजनविश्राचा । रघुवीरमानसआरामा ॥ध्रु.॥
सुरवरमंडण२ शुळपाणी । पुनाकपाणी शुभ वाणी ।
अगणित महिमा पुराणीं । प्रतापसिंधू गुणखाणी ॥१॥
गजमुख षण्मुख निज ताता । स्मरहर भवाह भवत्राता ।
परतर पावन पददाता । भोळा शंकर हर म्हणतां ॥२॥
काषा(य) अंबर निशाणी । दीतिकुळकंदन घमशानी ।
अखंड राहे स्मशानीं । कविवर म्हणती ईशानी ॥३॥
गिरिजावर गुरुवर सुखरासी । जन वन पावन पुण्यरासी ।
स्मरतां कर्पूरगौरासी । कल्याणदायक दासासी ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : March 23, 2014
TOP