मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणस्वामींची पदे|
ग बाईये पतीतपावन साधू । च...

श्री गुरूचे पद - ग बाईये पतीतपावन साधू । च...

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.


ग बाईये पतीतपावन साधू । चित्तीं अखंड लागला वेधू ।
मायाअविद्यातीत निजबोधू । ज्याचे हातीं वसे गोविंदू ॥ध्रु.॥
संतसंगाचा महिमा मोठा । लक्षचौर्‍यांसी दिधला फांटा ।
भवरोगासी लविले वाटा । भावभजनें भरिल्या पेठा ॥१॥
रामनामाचें केणें उघडें । देतां घेतां अधिक चि वाढे ।
भाग्यसंचित असतां घडे । तेथें न चले कुडे पवाडे ॥२॥
स्वानुभवाचा कौल पिकला । सर्व कल्याण उदयो जाला ।
लुलु ममताचंद्र मावळला । षड्‍रिपुसी पळ सुटला ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : March 23, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP