मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणस्वामींची पदे|
श्री गुरूचे पद

श्री गुरूचे पद

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.


श्री रामाचें, जय रामाचें । जय जय रामाचें ।
घ्या रे घ्या तुम्ही नाम या श्री रामाचें ॥धृ०॥      
आसनीं शयनीं गमनागमनीं । सांडुनी भान कामाचें ॥१॥
तारक याविण न दिसे कांहीं । बंधन नाहीं येमाचें ॥२॥
रामकल्याण विनवी भावें । सार्थक होईल जन्माचें ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : March 23, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP