मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणस्वामींची पदे|
श्री गुरूचे पद

श्री गुरूचे पद

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.


हरिस्मरणें रे चुकतीं जन्ममरणें रे ॥धृ.॥
उगम दुर्गम तीर्थे सरिता । जन्म चि न पुरे पृथ्वी फिरतां ॥१॥
वर्णाश्रम गुरु बाह्मण पुजिती । ते पूज्य मरतां नाम पढविती ॥२॥
प्रा ( य ) श्चित कोटी आन्हिक वदती ।
हरि हरि म्हणतां सकळिक शांती ॥३॥
विष्णुस्मरणें जडजीव तरती । नारद तुंबर ते गुन गाती ॥४॥
श्रीगुरुराज दयार्णवमहिमा । नित्य निरंतर कल्याण प्रेमा ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : March 23, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP