श्री रामाचीं पदें - पदे ५१ ते ६०
श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.
पद ५१ वें
तो राम पाहुं सन्मती श्री गुरुप्रसादें ॥तो०॥धु०॥
सहज सिंहासनीं आपण विराजे । संमुख नाचे मारुती ॥श्री०॥१॥
हळुहळु नाचुनि चैतन्य रामातें । आलिंगी अद्वय स्थिती ॥श्री०॥२॥
देवभक्त नामें हारपुनिं जेथें । मुकावल्या वेद श्रुती ॥श्री०॥३॥
राम विष्णु कृष्ण जगन्नाथ आंगें हें मंद भाग्य नेणती ॥श्री०॥४॥
पद ५२ वें
सहज सिव्हांसनीं आत्माराम राजा । केवळ प्राण विसावा माझा ॥धृ०॥
सन्मुख मारुती शोभे उन्मनी ते सीता । लक्ष लक्ष्मण अलक्ष लक्षितां ॥स०॥१॥
पाहांता सकल वृत्ति विराल्या मनाच्या । निरुपम सुख जेथें हारपली वाचा ॥स०॥२॥
विष्णु गुरुचरणीं ठेवितां हा माथा । देहायोध्ये माजी प्राप्ती कृष्णजगन्नाथा ॥स०॥३॥
पद ५३ वें
नाम स्मरुनिं कांहि काम सकल करीं । शाम सुंदर प्रभु राम करिल कृपा ॥धृ०॥
विपद विराम सर्व सुखाचा आराम । भज केवळ मनो विश्राम अद्वय रूपा ॥ना०॥१॥
कां मन तें मग कामनिक होइल । या मधुर रसा सेवुनिं निज अमुपा ॥ना०॥२॥
विष्णु गुरुसिरत कृष्ण जगन्नाथ । विषय तैल न खात प्राप्त ब्रह्मानंद तूपा ॥ना०॥३॥
पद ५४ वें
श्रीरामदासां प्रतिपालक साचा ॥धृ०॥
त्रिभुवन व्यापक इंद्रियचालक आत्मा जीवाचा ॥श्री०॥१॥
भद्भक्तांचा मी अभिमानी देव वदे साचा ॥श्री०॥२॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ प्रभुनाम स्मरुनि नाचा ॥श्री०॥३॥
पद ५५ वें
चला चला पाहुं चला श्री राम धनी रे । सौख्य तेंचि अनुभवितां न पुरे धणी रे ॥धृ०॥
कल्पनेचा उदधि महा घोर हा तरूं रे । आत्म स्मरण हेचि नौका सुदृढ धरूं रे ॥च०॥१॥
भक्ति वल्हें घालुनि धरुं ज्ञान सुकाणें रे । शीद वैराग्याचें लाउगि सावध रहाणें रे ॥च०॥२॥
देहारोग्य वारानुकूल होय जोंवरी रे । तोंवरि हें साधन साधुनिं जाऊं पर तिरीं रे ॥च०॥३॥
लक्ष लक्ष्मण उन्मनि सीता प्रेम मारुती रे । राम सौख्य धाम कृष्ण काम पूरती रे ॥च०॥४॥
पद ५६ वें
सहज सिंहासनीं श्री रघुराय । आत्मा भेटवी श्री गुरुपाय ॥धृ०॥
सच्चिदानंद स्वरूप अनंत ब्रह्मांडा धीप । मुळीं निर्विकार रूप दिसे तें तें वाय ॥स०॥१॥
सांडुनि विषय रति करितां दृष्टि वरती । उडे सन्मुख मारुति जेथें कपिराय ॥स०॥२॥
आनंदमय उडत अद्वय रामचि होत । विष्णु कृष्ण जगन्नाथ ऐक्य भावें ध्याय ॥स०॥३॥
पद ५७ वें
श्रीराम तो मी पाहेन डोळां आवडी ॥धृ०॥
वाहुनिं श्रमलों विषयाशेनें । जन्म मरण कावडी ॥श्री०॥१॥
अनंत ब्रह्मांडे धरि एकला जो । सुमनातें जसी वावडी ॥श्री०॥२॥
वैष्णव गुरुपथ कृष्ण जगन्नाथ । धरितो साडुनिं चावडी ॥श्री०॥३॥
पद ५८ वें
ह्लदयीं सदा राम भाऊं भवसागर तरुनी जाऊं ॥धृ०॥
जें सुख दायक नाम निरंतर, भागवतांसह गाऊम ॥ह्ल०॥१॥
संत समागम साधुनि वेगें, स्वस्वरुपीं मन लाउं ॥ह्ल०॥२॥
कृष्णजगन्नाथात्मज वदतो, परब्रह्म सुख पाहूं ॥ह्ल०॥३॥
पद ५९ वें
अशा मज कोणी कांहिं ह्मण ॥धृ०॥
धरिलें तें व्रत कदा न सोडूं । श्रीराम स्मरणा ॥अ०॥१॥
लोक लाज मज किमपि न लागे । आत्मैक्य स्फुरणा ॥अ०॥२॥
वंदिल निंदिल ज्या देहा तो अचुक पावे मरण ॥अ०॥३॥
यास्तब साधुनि संत समागम । करुम निज उद्धरणा ॥अ०॥४॥
विष्णु गुरूच्या कृष्ण जगन्नाथ । आठवितो चरणा ॥अ०॥५॥
पद ६० वें
ब्रह्मादी त्रिभुवनपति राम ध्याति । सदैव नाम गाति आनंद अति जयां विसर न घेति जाणोनियां निज हित गति ॥धृ०॥
ब्रह्मर्षि देवर्षि स्मरति ह्लदा । प्रहर्षित बुद्धि राघवीं सदा । होउनिया चढे जेथें अक्षय स्वरूपींरति । रमुनि जें सुख निजें आकळिजे ॥ब्रह्मा०॥१॥
उन्मत्त न चित्त विषयिं करा । न सत्य असत्य मीपण हरा । आपण पहावा राम अनुभवें त्रिजगतीं । नदरि जेविं वरिजे उद्धरिजे ॥ब्र०॥२॥
विष्णुगुरु हारि संसृति भया । कृष्ण जगन्नाथ आठवि तया । जद्वय दाविला जेणें आत्माराम सर्वांभुतीं । वर दिजे निरसिजें अघ बीजें ॥ब्रह्मा०॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : December 16, 2016
TOP