श्री नरहरितीर्थंचीं पदें - पदे ३५६ ते ३५७
श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.
पद ३५६ वें.
कमलासन गुरु विष्णु उपासक शिष्य जनां उद्धारी । पूर्णप्रज्ञ पद्मनाभ यति इंदिराकांत नरहरि ॥धृ०॥
अनादि गुरु करुणाकर प्रकटुनि आत्मस्तां सुख करी । चरण गुरुच्या शरणि रिघुनि दृढ स्मरण जया अंतरीं ॥क०॥१॥
विष्णू कृष्ण जगन्नाथ बहु प्रेरम गुरुपदा वरी । जनन मरण भय हरण गुरूंचे चरण निरंतर स्मरी ॥क०॥२॥
पद ३५७ वें.
इंदिराकांत गुरु शिष्य पाहुंया नरहरि तीर्थ स्वामी । दर्शन देउनि हर्ष करिति भक्त जनां अंतर्यामी ॥धृ०॥
आजि धन्य दिवस कीं धन्य आमुची उदय कळा दैवाची । यतिवर श्री गुरुमूर्ति भेटली जिवन कला जीवाची । तारक गुरु अवतार आत्मज थारविती सुखधामीं ॥इं०॥१॥
अनंत जन्मार्जित पुण्यानें संगति गुरुची घडती । गुरु वचनीं तत्पर नम्रत्वें ते़चि महत्वा चढती । पतितोद्धारक निजसुख कारक भवभय हारक नामीं ॥इं०॥२॥
तनु मन धन हें अर्पुनि गुरुच्या चरणिं वसो निष्कामीं ॥इं०॥२॥
तनु मन धन हें अर्पुनि गुरुच्या चरणिं वसो निष्कामीं । विष्णु कृष्ण जगन्नाथ प्रिय करिन सदा नमना मी ॥इ०॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : December 16, 2016
TOP