गवळण काल्यांतील पदें - पदे ३७५ ते ३८०
श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.
एक बोबडया गोपाल कृष्णाप्रत बोलतो
पद ३७५ वें.
तिथ्ना बलि मथलत् तलिथी थुंदलत लितीले ॥धृ०॥
दादलत दोपी अथति दली । तोली तलिथिल तो नपली । दलबल पलिथुनि थतल हली । धलिति तली ताय फुलें तिथ्ना०॥१॥
तोली तलनें हें न बलें । मद दिथतें ले थत्य थलें । थाल्या मेलुनि एतथलें । मालिल ती तिथ्ना०॥२॥
तूं तलि थ्याना ले हलि फाल । न तली ऐथा हा अवि-त्याला । आह्मां थांदथि वालंवाल । थुलत वित्याल धलि धलिती तिथ्ना०॥३॥
यशोदा कृष्णाचा शोध करिते-
पद ३७६ वें. धृपद.
बाल मुकूंद माझा आनंदाचा कंद श्रीहरि दावा गे सन्निध चुकला ॥बा०॥धृ०॥
निजांगणीं सहजि सहज आपुला आपण खेळतां तन्मय सन्मति असतां होउनि विस्मृतिं जहालिं विकला ॥बा०॥१॥
जिवींचें जीवन केवल चिद्धन शामसुंदर गुणनिधान ध्यान पाहतां भान नूरत साधूंचा विकला ॥बा०॥२॥
नावडे विषय देह गेह दृश्य सकल विफल स्नेह जाणीव तो मज कृष्ण जगन्नाथ कोणि भेटवा नयनि अनेकीं एकला ॥बा०॥३॥
पद ३७७ वें.
तरि शोधूं कवण्या ठाया जाउनि तरि माया हे विकट होता श्रीहरि निकट ॥तरि०॥धृ०॥
गृह धन दारादिक व्यवहारा भुललिं फुकट परि आला याचा वित ॥तरि०॥१॥
चिन्मय व्यापक तन्मय मतिचा मन्मथ बळकट करि खटपट ॥तरि०॥२॥
षड्गुण सुंदर मूर्ति जगाची कृष्ण जगन्नाथ धिट अद्वय निपट ॥तरि०॥३॥
श्रीकृष्ण गोपिकांच्या घरीं चोरी करण्यास येतो त्यावेळीं गोपिका आपसांत बोलतात
पद ३७८ वें.
नये लक्षितां हरि साक्षी हा करुं काय अंतरीं सांगा ग । वाटे माया सन्मुख वायां हे रचि कार्य कारण भाग ग ॥न०॥१॥
बोला अन्वय व्यतिरेक मन्मति निर्विकल्पचि व्हाया ग । किति चंचल अति निश्चल होय सांधू त्याचि उपाया ग ॥न॥२॥
गेलें व्यर्थ हें वय ना मिळे करितां प्रपंच विचारा ग । चला पाहुं कृष्ण जगन्नाथ पथ अन्यथा ना विहारा ग ॥न येलक्षितां०॥३॥
गोपिका यशोदे प्रत-
पद ३७९ वें.
ऐक यशोदेबाई हरि हा अगुणी बालक निर्गुण तूझा नेणासि रमणी ऐक ॥धृ०॥
रात्रिस हे मम मंदिरिं श्रीहरि घेउनियां पोरें । पति सेजे निजल्यांतीं विगलीत चिरें । वृश्चिक मुष्टीं धरितो हें काय बरें ॥ऐक०॥१॥
आणुनियां नकुल मम मंदिरिं मोकळितो श्रीहरी । झांकुळलीं भुत ह्मणोनि मग हाक बरी । करितां जन नगरींचे येती समोरी । भूतभयें रिघ-वेना काय वर्म तरी ॥ऐक०॥२॥
ऐसें संकट दुर्घट जाणुनि गोवळि पुरुषार्थी । परि देवा प्रार्थी अंतरिं घुसती । प्रजळुनि दिवटया नयनिं नकुला पहाती । खदखदां हांसुनि गौळी स्वगृहा निघती । ऐसा नाटक श्रीहरी करितो विपत्ती ॥ऐक०॥३॥
यशोदा कृष्णा प्रत-
पद ३८० वें.
नकूल कैसा कोठुनि तुज मिळाला घोंटूनि पाहतां नेटें अघटीत वाटे मोठें को. न. धृ० ॥
वृश्चिकदंशि अहंवृत्ति जैसी जाचवि देहा-त्मबुद्धि वांचविना कर्म खोटें ॥को०॥१॥
कुश्चित संगति दुश्चित करिती निश्चित न बरी हरि अविचारीं वय लोटे ॥को०॥२॥
नवनित साचे भवनि तयाचे भक्षुनियां घेसि कृष्ण जगन्नाथा शद्व खोटे ॥को०॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : December 16, 2016
TOP