मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कवी बांदरकर|
पदे ३३१ ते ३४४

श्री मदनंताचीं पदें - पदे ३३१ ते ३४४

 श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.

पद ३३१ वें.
तुज न सोडीं सर्वदा श्री अनंता, प्रेमें घालुनि घेतली गांठ सत्संगें बळकट ॥धृ०॥
कळलें त्रिभुवन तरंग उमटति चित्समुद्र तूं साचा सुलभ हा मार्ग संतां, ज्ञानें चोखाळितां वाट ॥तु०॥१॥
सच्चित्सुख स्वरूप स्फुरसि एकचि तूं परमात्मा त्रिजगाचा त्रिजगाचा नियंता, आजवरि केले खटपट नेणताम फुकट ॥तु०॥२॥
विष्णू कृष्ण जगन्नाथाची हरिली श्री मदनंता देहींची हे अहंता, मज झाली अद्वयत्वें भेट गेला द्वैत नेट ॥तु०॥३॥

पद ३३२ वें.
श्री मदन्मता सुलभ तुं संतां, परि मज विषय भ्रांता, उद्धरावें कमला कांता, भेट देउनि एकांता, हरीं देह भाव रे ॥धृ०॥
न धरी मन उमज, बहु भ्रमवि मज, विसरवि सुख निज, लवि संसाराची बोज, वाढवितें पाप बिज, देवा वेगें धांव रे ॥श्री०॥२॥
असतां मुळिंचा एक, दाविसि जग अनेक, मोठें मायेचें कौतुक, ठकविले ब्रह्मादिक, ह्मणुनि मारितों हाक, दयाघना पाव रे ॥श्री०॥३॥
अनंत सुख अपार, गुरु विष्णु तूंचि सार, कृष्ण जगन्नाथ फार, आळवितो वारंवार, घ्यावया स्वरुपिं थार, भक्ति मार्गिं लाव रे ॥ श्रीमदनंता सुलभ तुं संतां ॥४॥

पद ३३३ वें.
श्री मदनंता कृपानिधि मजला, दे निजलाभ अखंड सनातन ॥धृ०॥
कमल नयन प्रभु विमल चरणरज, दावुनिजां काढा मज, या विषयांतुनि ॥श्री०॥१॥
करुणा सागर करि कृपा मजवर, ठेउनियां शिरिं कर, उद्धरिं भवांतुन ॥श्री०॥२॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ नित्यनाम आठवित, कधिं भेट देसि हेतु हाचि मनांतुन ॥श्री०॥३॥

पद ३३४ वें.
श्री मदन्मतास मी निशिदिनीं नाम आठउनि ह्लदयिं वरिन ॥धृ०॥
यत्पद पंकज जीवींचें जीवन, मज पुजुनि आवडि भावें नमन करिन ॥श्री०॥१॥
सुख विषयांचें दु:खचि साचें, त्यजुनि सकल सार एकचि धरिन ॥श्री०॥२॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ, स्मरुनि दृढ ब्रह्मानंद, स्फुरे चित्तीं अखंड भरिन ॥श्री०॥३॥

पद ३३५ वें.
प्रभु भगवंता, श्री मदनंता । हरि माझी बळकट देह अहंता ॥धृ०॥
कोटि कोटि अपराध, होती तुझ्या पायीं । क्षमा करुनियां मज, भेट लवलाहीं ॥प्र०॥१॥
न सोडी प्रपंचाचा, अभिमान चित्ता । तूंचि संरक्षिसि पुत्र, कलत्र गृहवित्ता ॥प्र०॥२॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ, शरण तुला मी । चरण पाहिन ऐसा, हेतु अंतर्यामी ॥प्र०॥३॥

पद ३३६ वें.
अंत रहित निजस्मत गाति गुण, श्रीमदनंता रे ॥धृ०॥
अंतर साक्षी भेट मला किति, पाहसि अंता रे । स्वस्वरुपा़च्या साक्षात्कारें, नुरविं अहंता रे ॥अं०॥१॥
मत्पूर्वजांसि ध्यान तुझें, जन वदति वदंता रे । परंपरा असि चालविं लाउनि, भक्ति पदंता रे ॥अ०॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ शरण मी तुज, श्रीमंता रे । दिव्य दृष्टि मज द्यावी जैशी, दिधलि महंता रे ॥ अंत रहित निजसंत गाति गुण श्रीमदनंता रे ॥३॥

पद ३३७ वें.
तोचि श्री मदन्मत पाहुं चल आत्म भावें । संत साधु ज्यासि नित्य आठविती ॥तो०॥धृ०॥
योगियांचे ध्यानीं मनी, दाटला जो त्रिभुवनीं, भेटेल दिव्य नयनीं, धरुनियां प्रेम जरा, जलदिनें पाय उचला ॥ आत्मभावें ॥श्री०॥१॥
देखे अनंत शयन, त्यासि कधींहि भय न, करि कमल नयन, प्रभु संरक्षण, जेथें तेथें सच्चित्सुख संचला ॥ आत्मभावें ॥श्री०॥२॥
नवविध भक्तिपंथ, साधुनि निज महंत, सद्‍गुरु विष्णु अनंत, स्वरुप आंगें होउनि कृष्ण जगन्नाथ आचला ॥आत्मभावें ॥श्री०॥३॥

पद ३३८ वें.
श्री मदनंत कृपाघन वर्षुनि हर्षवि मति माझी वारुनी त्रिविध ताप, हरिं हें विविध पाप, शरण तुला रे । तुजविण कोण धणी तारीं मला रे ॥श्री०॥धृ०॥
सुख मानुनी संसारीं, जाच भोगिले म्यां भारीं, गुंतुनियां अविचारीं, मीच भ्रमला रे । संत संगतीनें कांहीं कळली कला रे । ॥श्री०॥१॥
विषयी जनाचा संग, करी साचा मनोभंग सदा राहेन नि:संग, हेतु लागला रे । स्वरुपीं अंतरंग, जडूं हा भला रे ॥श्री०॥२॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ, उद्धरुनि वेगें आतां, नुरविं प्रपंच व्यथा, जीव श्रमला रे । दुर्लभ हा नर तनु लाभ लाभला रे ॥श्री०॥३॥

पद ३३९ वें.
येरे श्री मदनंता, हरिं भव चिंत्ता । जनन मरण वारीं जलद जलद ये ॥धृ०॥
आठवतें कधिं गांठ होइल तुझी । वाट पहातों तारीं जलद जलद ये ॥ये०॥१॥
कमल नयन पद विमल दाउनि माझीं । निरसाबीं दु:खें सारीं जलद जलद ये ॥ये०॥२॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ शरण तुज । निशिदिनि हाका मारि जलद जलद ये ॥ये०॥३॥

पद ३४० वें.
सदन सुखाचें वदन सुंदर, श्री मदनंत पाहुं । पदनरव लखलख, सखि कोटी मदन मोहित गाऊं ॥धृ०॥
ह्लदय कमलीं कमल-जयुत-कमलनाभ वाहूं । निरखुनि पद कमल , नमुनि विमल होउनि राहूं ॥स०॥१॥
सादर असुनि कदर रहित नदर अलक्षीं लावूं । विष्णु कृष्ण जगन्नाथ दाविल मार्ग चला जाऊं ॥स०॥२॥

पद ३४१ वें.
गुरु वैष्णवीं दाविला तो हा अनंत ॥धृ०॥
सच्चिदानंद स्वरूप पाहिला रे पाहिला रे ॥गु०॥धृ०॥
शंख चक्र पद्म गदा हातिं विराजती सदा, नाभी कमलीं चतुर्मुख लक्ष्मीचरणीं सर्वदा, ऐसा चिद्‍घन ह्लदयीं वाहिला रे वाहिला रे ॥गु०॥१॥
कोटी ब्रह्मांडें ज्या पोटीं, त्याची मज केली भेटी, एकाएकीं आत्म नेटीं, हरिली देहबुद्धी खोटी, निजनाम किर्तनीं लविला रे लविला रे ॥गु०॥२॥
विष्णु गुरू श्री मदनंत, व्याप्य व्यापक विरहित, निर्विकार सदोदित, अंगें कृष्ण जगन्नाथ होउनीं सुख अत्यंत, राहिला रे राहिला रे ॥गु०॥३॥

पद ३४२ वें.
मज आजि श्री मदन्मत मिळाला उद्धरिलें कोटी कुळांला ॥म०॥धृ०॥
सच्चित्सुखरुप आपण होता, आला तोचि पळाला ॥म०॥१॥
निज अंतरंगें, दर्शन स्वांगें घडलें ताप जळाला ॥म०॥२॥
विष्णु गुरु सुख अनंत, न विसंबें कृष्ण जगन्नाथ । जैसा मीन जळाला ॥म०॥३॥

पद ३४३ वें.
नमन श्री मदनंता तुजला । अंतरहित सुख संत संगतिनें, अखंड हो मजला ॥नम०॥धृ०॥
जागृति स्वप्न सुषुप्ति वलंडुनि । शेष शयनि निजला ॥नम०॥१॥
निज दर्शन प्रेम रसा स्वादुनि । अंतरं ग भिजला ॥नम०॥२॥
विष्णु गुरू अनंत कृष्ण जगन्नाथ । आत्मपदीं भजला ॥ नमन श्री मदनंता तुजला ॥३॥

पद ३४४ वें.
श्री मदनंत सुखात्मक देव । अनन्य शरण तुज भावें रे ॥धृ०॥
वित्त कलत्र प्रपंच विचारीं, निमिषहि एक नसावें रे । नित्य निरंतर चरणीं तत्पर, होउनि चित्त असावें रे ॥श्री०॥१॥
नवविध भजन घडुनि या देहीं, निजात्म दर्शन व्हावें रे । संत समागम अखंड सेवुनि, स्वस्वरुपींच रमावें रे ॥श्री०॥२॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा त्वां, सदैव हें मज द्यावें रे । नाम स्मरण विरहित माझें, वय हें फुकट न जावें रे ॥श्री०॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP