मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कवी बांदरकर|
श्लोक ६१ ते ६९

पवित्र उपदेश - श्लोक ६१ ते ६९

श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.

आज्ञा सद्नुरुची मनीं धरुनियां तैशा परी वागलों । झालें प्राप्त असंग शस्त्र म्हणुनी दु:खें न मी भागलों ॥
श्रीरामीं मन रंगलें सकळही सृष्टी सुखाची दिसे । या तत्त्वा गुरुभक्त जाणति जयां श्रद्धा गुरुक्तीं असे ॥६१॥
राधे ते एकटयाला मजचि करुनि हा बोध गेले न मानी । जेजे आहेत होती स्वकुळिं सकळ त्यां बोलिले मोक्षदानी ॥
कृष्णानंदासवें तूं ह्रदयिं धरुनियां प्रेमवाक्या तयांच्या । स्वानंदीं मग्न होईं स्मरुनि निशिदिनी गोड नामा प्रभुच्या ॥६२॥
ज्या वासना उठति अंतरिं मुळ त्यांचें । सच्चित्सुखस्वरूप आपण एक साचें ॥
अभ्यास साधक जरी करि या परी तो । आत्मैक्य चिन्मय निनृत्ति पदाबरीं तो ॥९३॥
निवृत्ति सुख जेम स्फुरे स्वरूप आपुलें तें पहा । अलक्ष अवलोकुनी उलट द्दष्टिनें तूं रहा ॥
नसे कधिंच नाश त्या सुजन राम हे बोलती । वरूनि ह्रदयीं तया अनुभवें सदा डोलती ॥६४॥
ग्रंथ श्री गुरुबोध सद्‌गुरुवरें प्रेमें करूनी मला । स्वप्नीं देउनि दर्शना लिहविला तारील तो कीं तुला ॥
त्या ग्रंथीं रघुराज रूप कथिलें एकाग्रचित्तें पहा । अभ्यासा करुनी सुखसवरुप तूं होऊनि आंगें रहा ॥६५॥
केला हा उपदेश निर्मळ मनें जो राधिके मी तुला । प्रेमें वागवुनी सदोदित मनीं त्वां उद्धरावें कुला ॥
साराचें निजसार नाम हरिचें त्याची असो दे स्मृती । त्या वांचूनि नसे गती सुजन हें अत्यादरें बोलती ॥६६॥
उत्कंठा मानसीं ही बहुत दिन वसे तीर्थ यात्रेसि जावें । भावें संतां नमावें त्यजुनि सकळ हें साधु संगीं रहावें ॥
आला तो योग आतां दिसत मज असे राधिके येतसें मी । कृष्णानंदीं सदा हो रत खचितचि तूं पावसी सौख्य धामीं ॥६७॥
कृष्णानंद तशीच तूं उमयतां नांदा सुखानें सदां । साधा श्रीहरि भक्ति तो रघुपती लागों दे आपदा ॥
आशीर्वाद असा वदूनि गुरुच्या पायांसि मी लागतों । या विश्वासि सुखी करीं चरणिं त्या प्रेमादरें मागतों ॥६८॥
गुण बाणाष्ट भूशा कीं श्री प्रजापति वत्सरीं । उपदेशा तुला राधे केला तो ह्रदयीं धरीं ॥६९॥

इत्युपदेश संपूर्णम्‌
॥ जय जय रघुनीवर समर्थ ॥
॥ श्रीराम समर्थ ॥

N/A

References : N/A
Last Updated : June 16, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP