मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कवी बांदरकर|
श्लोक १ ते १०

पवित्र उपदेश - श्लोक १ ते १०

श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.

मी माझें हरि विन्घ जो गणपती श्रीराम सीतापती । श्रीमद्वैष्णव कृष्ण सद्‌गुरुवरां वंदुनियां निश्चितीं ॥
जे बोधामृत पाजिलें गुरुवरें पूर्णकृपेनें मला । त्या बोधा कथितों सुयोगचि पहा राधे तुला लाभला ॥१॥
राधा नाम तुझें वरूनि सुयशा बाधा भवाची हरीं । साधाया हित राम देव गुरुची तूं नित्य सेवा करीं ॥
साध्वी धन्य पतिव्रता म्हाणवुनी घे सज्जनाच्या मुखें । कृष्णानंदपदीं सदैव रमुनी सौभाग्य भोगीं सुखें ॥२॥
माझ्या सद्‌गुरुनीं मला शिकविलें कीं संतसंगा धरीं । कोणाचें दुखवीं न चित्त सुख त्यां तूं अन्नदानें करीं ॥
यद्दाना सम अन्य दान न जगीं जाणूनि शांती वरीं । जी प्राप्त स्थिति तीच सौख्यकर हेम मानूनि राहें बरी ॥३॥
हरिभजन करावें तीर्थ यात्रेसि जावें । न विषय विष प्यावें साधु संतां नमावें ॥
स्वसुख रत असावें चित्त रामीं वसावें । गुरुचरणि जडावें मानसा आवडावें ॥४॥
सकळ जन सुखाचे जे दिल्या घेतल्याचे । पुरति जरि मनाचे हेतु तैं चित्त नाचे ॥
निखिल जग असें हें यांत माझा न कोणी । परम कठिण काळीं सोडवी चक्रपाणी ॥५॥
वैराग्या परतें न भाग्य कथिलें जें सद्‌गुरुंनीं पहा । आला प्रत्यय कीं न चित्त विषयीं रंगे महा लाभ हा ॥
जी प्राप्त स्थिति गोड तीच गमते ही राघवाची दया । जी वृत्ती करि पात्र जन्ममरणा ती जाहली चिन्मया ॥६॥
स्वसुखमय दिसे हें सर्वही विश्व मातें । सकळहि व्यवहारीं सौख्य वाटे मनातें ॥
सदय गुरुवरें ज्या बोधिलें साधनाला । द्दढ धरुनि मनी त्या लाधलों या पदाला ॥७॥
जननि जनक राधा कृष्ण माझ्या जिवाचे । हरिति भय भवाचें नाम गातांचि वाचे ॥
अनुभव सुक माझें बोलतां कंठ दाटे ॥ तुन मन धन सारें सद्‌गुरुरूप वाटे ॥८॥
संतोषरूप रघुराज मनीं प्रकाशे । देहात्मभाव भवबंध समूळ नाशे ॥
आनंदपूर्ण तरि चिंतन चित्त सोडी । वाटे न त्या कधिंच या विषयांत गोडी ॥९॥
निवांत जागीं करिं या विचारा । प्रपंच हा दु:खर जाण सारा ॥
चित्तास शांती तिळमात्र नाहीं । याचें असे ह्या परि रूप पाहीं ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : June 16, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP