श्री पद्मनाभतीर्थ स्वामीचीं पदें - पदे ३५१ ते ३५३
श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.
पद ३५१ वें.
पाहुं चला यतीश्वर पद्मनाभ गुरु छ्द्म रहित सुख सद्म आमुचें, मानवा काय पहासि अजुनी ॥धृ०॥
जाय वय फुकट काय, करिसि गुरु बाप माय, वश असुनि सदा । तरि शरण जाउनि भावें चरण ह्लदयिम धरुं येधवां देह मी पण त्यजुनि ॥पा०॥१॥
घाळ न व्हा कीं काळ ग्रासिल तनु व्याळ मृदु नच सोडिल कदा । प्राण ओढुनि काढिल देह धरणि पाडिल, मग केधवां मुक्ति पावसि भजुनि ॥पा०॥२॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ स्मरण, हरि जनन मरण भव भय आपदा । स्वामी सदय ह्लदय, सुख उदय करिति जनि, जेधवां निज हित उमजुनि ॥पा०॥३॥
पद ३५२ वें.
शरण जाऊं पद्मनाभ यतिला, पद्मनाभ पद पद्मिं रमतां सुख-रवप्नि नेईल मज दृढतर निश्चय ॥श०॥धृ०॥
पूर्णप्रज्ञ गुरु शिष्य करिति, परि पूर्ण मनोरथ तूं हरुनि भय ॥श०॥१॥
पाप जनित भव ताप हरुनि, निष्पाप करिल गुरुबाप अमृतमय ॥श०॥२॥
नीरदास श्री विरविठ्ठल, प्रभु विष्णु कृष्ण जगन्नाथ न विसरुं अद्वय ॥श०॥३॥
पद ३५३ वें.
पद्मनाम गुरु शिष्य इंदिराकांत यतिद्वय पाहुं या । शांत दांत वेदांत कुशल ज्यां, सन्मुख हरिगुण गाऊं या ॥धृ०॥
कृपा कटाक्षें लक्षिति ज्यांचे पदरज मस्तकिं वाहु या ॥शां०॥१॥
दर्शन मात्रें निवती गात्रें, अखंड जवळीं राहुं या ॥शां०॥२॥
विष्णु कृष्ण जगन्नाथाचें, जीवन सुखमय लाहुं या ॥शां०॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : December 16, 2016
TOP