श्री देवकीकृष्णाचीं पदें - पदे ३६२ ते ३६३
श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला. N/A
पद ३६२ वें.
दर्शन दे रे श्री देवकीकृष्णा, मजला निज दर्शन दे रे । श्री देवकिकृष्णा बहु मी होतों व्याकुळ बा तुजसाठी गोकुलवासी दर्शन दे रे ॥धृ०॥
धरवेना धीर चित्त नसुनि स्थिर चंचल विषय सुखाची अति वाढवी तृष्णा । किति विनवूं मति श्रमली सदस्या जाणुनि ह्लदय निवासी ॥द०॥१॥
कौरवी छळितां पांडव नारी गौरविली भेटुनि त्वां संरक्षिली कृष्णा । अजुनि मला कां तळमळविसि करुणानिधि ये उदयासी ॥द०॥२॥
विष्णु कृष्ण जगन्नाथाची तूंचि पुरविसी आवडी हरुनियां त्रिविध उष्णा । सच्चित्सुख-मय स्वयंप्रकाशक पाहेन आत्मपदासी ॥द०॥३॥
पद ३६३ वें.
देवकी नंदन कृष्ण कृपाघन सेवक वंदन करि तुज निशि-दिनी ॥धृ०॥
विसरेना घडि भरी, खेळविति कडेवरी, माता आवडिनें भारीं, वसुदेव कामिनी ॥दे०॥१॥
वदन सुंदर कोटि मदन मोहित सुख सदन तूं आठविसि मज निज लोचनीं ॥दे०॥२॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ ह्लदयीं प्रिय आत्म उदय होय भय विरहित दिन यामिनी ॥दे०॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : December 16, 2016
TOP