मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कवी बांदरकर|
पदे ३८१ ते ३८५

गवळण काल्यांतील पदें - पदे ३८१ ते ३८५

 श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.

कृष्ण यशोदे प्रत-
( मलय गव्हरीं अद्‍भुत शोभा० या चालीवर )

पद ३८१ वें.
निर्विकल्प सच्चिदानंद मी, नेणति या मातें ॥ केवळ जड तनु शाश्वत मानुनि कल्पिति कामातें ॥धृ०॥
मन्मूर्तीवरि बळकट प्रेमें लंपट मन करिती । विषयदृष्टिनें दिननिशिं हा आकार ह्लदयिं धरिती । दृश्य-चराचर चिन्मय ऐसी वृत्ति न तिळभरि ती । आत्मसुखास्तव आळविती बहु मज निष्कामातें ॥नि०॥१॥
यद्यपि चिद्धन तो मीं या अबलंसि नसे ठावा । केवळ सगुणीं पूर्ण जयाहीं धरिला सद्दावा । जाणुनि मीं अवतारि होय सद्भक्तांच्या गांवा । मायाब्रह्मीं सहज घडे हा स्फुरण धर्म मातें ॥नि०॥२॥
अवस्थात्रयातीत हरिन नवनीत कसा यांचें । जसा तसा असतांचि स्फूर्तिरुप जग नटलों साचें । तंतूपट मृद्धट दृष्टांतें, कारण कार्याचें । कर्ता कृष्ण जगन्नाथ नसुनि घेती नामातें ॥नि०॥३॥

यशोदा गोपिकां प्रत-

पद ३८२ वें.
चिन्मय हरि तो हा गोपिका तुह्मी पावति कां मोहा ॥धृ०॥
अखंड साक्षित्वें पाहतां या न जायेचि कोठें अलक्षी लक्ष लावुनियां पहा ॥चिन्म०॥१॥
आपुला आपण तन्मय असतो न बोले मी खोटें चंचल वृत्ति सांडुनियां रहा ॥चिन्मय०॥२॥
कृष्ण जगन्नाथ सदा अनु-भवी आत्म सौख्य मोठें । घालितां ज्यावरी आळ वृथा पहा ॥ चिन्मय हरि तो हा गोपिका तुह्मी पावति कां मोहा ॥३॥

गोपिका यशोदे प्रत-

पद ३८३ वें.
बाई नलगे अंत साचा हे सुमति या अनंताचा ॥धृ०॥
ब्रह्मा पोटींचा तो बाळ । ह्मणतो कंसाचा मी काळ । वधिला शंखासुर चांडाळ । घेउनि अवतार मत्स्याचा ॥बाई०॥१॥
अनंत ब्रह्मांडांच्या काया । कल्पुनि नटली जे चिन्माया । ते कथितो हा आपुली जाया । केवळ देव मी देवांचा ॥बाई०॥२॥
घुसळण करितां मज मंदिरीं । निंदुनि वदतो हा श्रीहरी । क्षीरोदधि म्या मथिला नारी । वेष धरिला जैं कूर्माचा ॥बा०॥३॥
बोलत वराह वेषें भारीं । बधिला हिरण्याक्ष देवारी । पृथ्वी धरिली दाढेवरी । तुह्मां श्रम जल कुंभाचा ॥बाईन०॥४॥
चिरतां फळ वस्तूतें पाहे । सांगे नृसिंह तो मी आहे । हिरण्यकशिपू विदा-रिला हे । सत्यबाप प्रर्‍हादाचा ॥बाई०॥५॥
सांगत स्वरूपें मी निष्काम चिद्धन वामन भार्गवराम । कृष्ण जगन्नाथ आराम । प्रेमळ जाण मद्भक्तांचा ॥ बाई नलगे अंत साचा हे सुमति या अनंताचा ॥६॥

पद ३८४ वें.
आत्मगृहीं राहिं हरी रे । गोपिसदनां कां जासी रे आ०॥धृ०॥
तुज सम कोणी त्रिभुवनि आणिक रे । न दिसे मला गुणरासी रे ॥आ०॥१॥
निशिदिनि धंदा तुझाचि गोविंदा रे । जातो कधिं वा त्याचा वासी रे ॥आ०॥२॥
कृष्ण जगन्नाथा विनविति आतां रे । अजुनि तरी न जा त्यांसी रे ॥आत्मगृहीं०॥३॥

यशोदा गोपिकां प्रत

पद ३८५ वें.
दीननिशि या हरिसी वैर वाहतां गोपनारी कोप धरुनि व्यर्थ पाहतां ग ॥दीन०॥१॥
कानयाचा कान तुह्मां मानतो कसा ग दाटुनि कलि उद्भवितां वाटे तो कसा ग ॥दीन०॥२॥
नित्य निर्मल निश्चल गृहिं व्यात्प गोधना गं । बाष्कळ तुह्मी कृष्ण जगन्नाथ बोध ना ग ॥ दीननिशि या हरिसि वैर वाहतां गोपनारी०॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP