यशोदा कृष्णा प्रत -
पद ३९६ वें.
कैसि करणि तुझी रे ऐसि हरी न बैससि घरीं उगा कां आपुला । जाउनि गोपिसदनि करि छळण नानापरी न शोभे हें तुला ॥कैसी०॥१॥
निज भजनि लाउनि मज गोडी, रजनि दीन मोडीं, विषयींच्या हेतुला पाहताम स्वरूप घडी घडी न मति होय वेडी प्रपंचीं व्याकुला ॥कैसी०॥२॥
कृष्ण जगन्नाथ सुखमय सुधी, होईल माझी तधीं, न पाडिसी जयिं भुला । तुजविण तरि भवनिधी, तरुं मी कोणे विधी, सांग बापा मुला ॥ कैसी करणि तुझी रे ऐसि हरी न बैससि घरीं उगा कां आपुला०॥३॥
यशोदा गोपिकां प्रत-
पद ३९७ वें,
नित्य कां न आवडे हा धंदा । गोप युवति तुह्मी कोप बुद्धिनें लोपति या संसारि नि०॥धृ०॥
सत्यासत्यविचारें अंतरीं जाणति मी या हरिला केवलानंदकंदा । अनंत जन्मार्जित पुण्याचा उदय होय कंसारि ॥
नित्य०॥१॥
सांडुनियां अविचार करा ग लाग निजस्वहिताचा न वदा मुखें निंदा । चंचला वृत्ति याचि विपत्ती भोगितसां तुह्मी भारीं ॥नित्य०॥२॥
कृष्ण जगन्नाथ चि हा सकळां तारकसा मजवाटे नुरवितां दु:खकंदा । स्वात्मसुखें आत्मगृहिं खेळत देखतिं वारंवारीं ॥नित्य०॥३॥
गोपिका यशोदे प्रत-
पद ३९८ वें.
हरि लागी कांहीं न चले उपाय, जेथें जाऊं तेथें आपण मागें पुढें ठाय ह०॥धृ०॥
सगुणी निर्गुण कळवि हे खुण, वळवि वृत्ति माझि स्वरुपीं तरी या करुं मी काया ॥हरि०॥१॥
प्रतिवृत्तीचा साक्षी साचा, अलक्ष लक्षुनि पाहतां समुळीं मीपण माझें खाय ॥हरि०॥२॥
आनंद चिद्धन केवल आपण, कृष्ण जगन्नाथ भरला एकचि अंतर्बाह्य ॥ हरि लागीं कांहीं न चले उपाया०॥३॥
यशोदा कृष्णा प्रत-
पद ३९९वें.
आइकें कायी वदती या तुज व्रजनारीरे, किती विनविती नानापरी, तूं होऊ नको दुरीं न जायें गोपिघरीं ॥आ०॥धृ०॥
बाल-मुकुंदा आनंदकंदा छंद न उचित पुतनारीरे । आपुला आपण चराचरीं, खेळसि तो तूं हरी, जाणतें मी अंतरीं ॥आईकें०॥१॥
लक्षुणि पद निज विषयिक तजविज, किमपीं न होईं या संसारि रे । पूर्ण परब्रह्म मूर्ति खरी, स्फुरति न दुसरी, निश्चय आत्मवरी ॥ आइकें०॥२॥
कृष्ण जगन्नाथा त्वद्नुणगाथा गातां गातां देहभान वारि रे । ज्ञानभक्ति रस सरोवरीं, तन्मय मति बरी, मज्जन नित्य करी ॥ आइकें कायी वदती या तुज व्रज नारी रे ॥३॥
यशोदा गोपिकां प्रत-
पद ४०० वें.
हरिसम दुसरा हो प्रिय न जगीं ह० विसरा विसर ग्रासुनि पाहतां आपला आपण नित्य निश्चल घरिं ह०॥धृ०॥
सच्चित्सुख स्वरूपचि हा मी, अखंड देखतिं स्वानुभवें कीं, न कर्ळुनि कोणी कायि ह्मणो-परि ॥हरिसम०॥१॥
कल्पित सृष्टि कळतां कष्टी, विचार दृष्टी होय न ते मग, जरि हें भासे दृश्य परोपरी ॥हरिसम०॥२॥
सन्मार्गी जों वृत्ति वळेना, तो कृष्ण जगन्नाथ कळेना, गोपि सकल तुह्मी किति वदलां तरि ॥हरिसम दुसरा हो प्रिय न जगी०॥३॥