मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कवी बांदरकर|
पद ३०४ वें

श्री मंगेशाचें पद - पद ३०४ वें

 श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.

पद ३०४ वें.
श्री मांगिरीश चरणिं शरण तुझ्या, करुणाघन वश व्हावें रे ॥धृ०॥
दमन करित इंद्रिय मन, ऐसें आत्म ज्ञान मज द्यावें रे । स्वरुप सुखानुभवांतचि रंगुनि, चित्त निमग्न असावें रे ॥श्री०॥१॥
सिद्ध शिरोमणि स्वस्मरणानें, लक्ष अलक्षिं बसावें रे । स्वयंजोति आपणासि ह्लदयिं म्या, उलटुनि आंगें पहावें रे ॥श्री०॥२॥
श्री शिवशंकर जोडुनि उभय कर, विनवितसें तुज भावें रे । वैष्णव कृष्ण जगन्नाथ पदीं, मुरवीं दृष्य अभावें रे ॥श्री०॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP