मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कवी बांदरकर|
पदे २६९ ते २८१

श्री नृहसिंहाचीं पदें - पदे २६९ ते २८१

 श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.

पद २६९ वें.
नरहरि तो भेटवा हो । कोणि तळमळ माझि चुकवा हो ॥धृ०॥
देहन मी द्विज काय तुह्मांला । करिन चरण सेवा हो ॥न०॥१॥
कळला हा संसार पुरे मज । होती जाच जीवा हो ॥न०॥२॥
सज्जन जे तुह्मीं सदय तयांतें । मज साठीं विनवा हो ॥न०॥३॥
जगन्नाथ सुत कृष्ण तुमचा । करितो नमन वांचवाहो ॥न०॥४॥

पद २७० वें.
ध्यास तुझा ह्लदयीं नरसिमह निरंतर । भेट कृपाक र मज-वरी रे ॥धृ०॥
पाहुनिं तव मुख सेविन मीं सुख । होइं देवा संमुख झडकरीं रे ॥ध्या०॥१॥
त्रिविध ताप मज जाचविती निज । दावि पद पंकज नरहरी रे ॥ ध्या०॥२॥
धन सुत जाया जाइल काया । दुस्तर माया आवरीं रे ॥ध्या०॥३॥
जगन्नाथ द्विज बाळ विनवि तुज । कृष्ण पाप बिज परिहरि रे ॥ध्या०॥४॥

पद २७१ वे.
नरहरि तूं मजला प्रिय वाटे । मन दाटे निज पद आठ-उनीं ॥धृ०॥
हा मज ध्यास निरंतर देवा । जीवा दे सुख गांठउनीं ॥न०॥१॥
दुष्ट पातकी विषय सुखीं मी बुडालों कर्में दटउनी ॥न०॥२॥
कृष्ण जगन्नाथात्मज याला । मुखमय करिं तुज भेटउनीं ॥न०॥३॥

पद २७२ वें.
किति चुकलों नकळे नरसिंहा । मज जेव्हां दुरदुरसा दिससी ॥कि०॥धृ०॥
व्यापक हेम नगीं जग तैसा । व्यापुनि चिद्रूपें अससी ॥कि०॥१॥
तळ मळ जीव पणाची माझी । न सुटे काय उगा बससी ॥कि०॥२॥
जगन्नाथ सुत कृष्ण वदे कीं । निर्दय मनिंचा तूं नससी ॥किं०॥३॥

पद २७३ वें.
लागला मज नरसिंह असा ध्यास ॥धृ०॥
दर्शन देउनि पावन केला । हरिला माझा त्रास ॥लागला०॥१॥
प्रल्हा-दाचा जो वर दाता । सुखकर तोचि मनास ॥लागला०॥२॥
जगन्नाथ सुत कृष्ण ह्मणे मी । झालों नरहरि दास ॥लागला०॥३॥

पद २७४ वें.
सेवीं नारसिंहराज । नको मना तळ मळ ॥धृ०॥
विषयी जनाची संगती सांडीं । किति तुज विनवणि करितों कांहीं धरीं लाज ॥से०॥१॥
साधु समागम लक्षुनि जाईं । दुसरा हा भव निधि तरणें साधीं हेंचि काज ॥से०॥२॥
जगन्नाथ बाळक कृष्ण तयाला । फिरविसिकां पर सदनीं येइना किं वाज ॥ सेवीं नारसिंहराज०॥३॥

पद २७५ वें.
गाइन प्रेम भरित नरहरी । मुख पाहिन सुख मज तो करी ॥धृ०॥
इहपरलोकीं जें उपयोगी साधीन तें झडकरीं ॥गा०॥१॥
त्याहुनि आणिक कोणि न मजला । निश्चय हा अंतरीं ॥गा०॥२॥
यात्या मागें काय फिरोनी । हेचि सुलभ चाकरी ॥गा०॥३॥
जगन्नाथ सुत कृष्ण तयाचा । प्रेम अधिक ज्या वरी ॥गा०॥४॥

पद २७६ वें.
सदय ह्लदय नरसिंह मला दे । निज सुख ब्रह्म रसाचें ॥धृ०॥
संचित प्रारब्ध क्रियमाणें । जनन मरण सुखदु:ख जिवाला भोग घडे हें साचें ॥स०॥१॥
हा भव बंध अविद्या योगें । पुत्र मित्र धन कलत्र नोहे शाश्वत दों दिवसाचें ॥स०॥२॥
तनय जगन्नाथा विनवी । कृष्ण कृपाघन नरहरि राया करिं हित निज दासाचें ॥स०॥३॥

पद २७७ वें.
धन्य दिवस माझा आज । भेटला नरसिंह महाराज ॥धृ०॥
जन्म सफल नरहरिनें केला । साधुनि माझें काज ॥ धन्य दिवस मा० ॥१॥
चंचल हें मन वस्तू ठेवुनि । दिधलें त्याचेम व्याज ॥ धन्य दिवस मा०॥२॥
भक्त जनाचें कार्य कराया । किमपि न ये त्या वाज ॥ धन्य दिवस मा०॥३॥
बोले कृष्ण जगन्नाथात्मज । नाचूं सांहुनि लाज ॥ धन्य दिवस मा०॥४॥

पद २७८ वें.
पाहिन निज डोळां श्री नरहरिला ॥धृ०॥
प्रल्हादा कारणें, स्तंभ गाजविला जेणें । भक्तांसि भेटि देणे हेतु हा जया । नित्य नाम उच्चारणें, मज सौख्य कोटि गुणें, अंतरिंचा श्रम हरिला ॥पा०॥१॥
संसारीं गुंतणें, काय लाभ घडे येणें, नेणतां मूर्खपणें नासिलें वया । अंति-यम लोकीं जाणें, नको नको ऐसें जिणें , नारसिंह मनीं धरिला ॥पा०॥२॥
श्री विष्णु स्मरणें, नित्यानंदिं मग्न होणें , भक्ति सुखा काय उणें, कृष्ण दास या । हरिसम आत्म खुणें, दाउनियां नारायणें, निवटिलें भव करिला ॥ पाहिन निज डोळां श्री नरहरिला ॥३॥

पद २७९ वें
तोचि नरहारी आजि पाहिला । बहुजन्मार्जित पाप ताप गेलें आपें आप । ऐसा प्रताप दाटे अंतरीं सुखरूप । येतां असुराचा कोप धरि भ्यासुर स्वरूपास्तंभिं कड कड कडाडला । जो रव गगनीं घडाडला । त्रिलोक धाकें धडाडला ॥तो०॥१॥
सहस्त्र सूर्य लोप पावति तेजीं अमूप । देखे विकट रूप कांपे कनक कशिप । त्यासि देव घालि झेंप ओढुनियां झपाझप । अंकिं उतारणा पाडिला, फड्‍फड्‍ तो रिपु फाडिला, समूळ दुर्मद झाडिला ॥तो०॥२॥
प्रपंच हा अंध कूप, जेवीं कासवीचें तूप । अखंड ज्ञान दिप, नारसिंह विष्णु रूप । सांडुनि अज्ञान झोंप, भक्त प्रल्हाद समीप । नृसिंह दर्शन गोडिला, संसारभ्रम सोडिला, निज मनिं कृष्णें जोडिला ॥तो०॥३॥

पद २८० वें.
नरसिंह राजा ब्रह्म सनातन रे ॥धृ०॥
रौप्यहि नोहे दगडही नोहे । नोहे कांचन रे ॥न०॥१॥
या जड देहा फिरवि तयाचें । करणें चिंतन रे ॥न०॥२॥
कृष्ण जगन्नाथात्मज याचें । करि पद वंदन रे ॥न०॥३॥

पद २८१ वें.
श्री नारसिंह नमन तुला सदया ॥धृ०॥
सर्वां भूर्तीं आत्म विभूती । दावुनि हरिसि भया ॥श्री०॥१॥
अनुभव हा प्रल्हा-दासि महा । स्तंभीं ये उदया ॥श्री०॥२॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ तुझा । निश्चय दृढ ह्लदया ॥श्री०॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP