श्री बिंदुमाधवाचें पद - पद ३०५ वें
श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.
पद ३०५ वें.
भव सिंधु तरविं बिंदु माधवा रे ॥धृ०॥
बंधु सुत कलत्र नेट । सकळ हा तुझाचि खेळ । पाहेन तुज वेळोवेळ । हेतु हा जिवारे ॥भ०॥१॥
नुरउनि अज्ञान मदा । पुरवि प्रेम हा सुखदा । दुखुं नको शरण सदा । चरन राजिवारे ॥भ०॥२॥
दाउनि प्रिय आत्मपदा । दे अखंड भक्ति सुधा । लागलि मज हेचि क्षुधा । हरिसि केधवां रे ॥भ०॥३॥
गावूं गुण दिन रजनीं । राहेन निजभक्त जनीं । होउनि सुविरक्त मनीं । प्रीति जेधवां रे ॥भ०॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ ह्लदयिं आपणासि ध्यात । आवडिनें नाम गात । नित्य वैभवा रे ॥भ०॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : December 16, 2016
TOP