मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कवी बांदरकर|
पदे २८९ ते २९२

श्री कपिलेश्वराचीं पदें - पदे २८९ ते २९२

 श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.

पद २८९ वें.
नमन तुज कपिलेश्वर देवा । देइं रे मज आत्म भजन सेवा ॥धृ०॥
येइं रे वेगीं धांवुनि उमा रमणा । करुं रे कसि तुजविण मी क्रमणा ॥न०॥१॥
यावया तुज उशिर जरी ऐसा । गावया गुण धीर मजला कैसा ॥न०॥२॥
चरणिं विष्णु कृष्ण जगन्नाथा । दाखविं मज प्रिय निज गुणगाथा ॥न०॥३॥

पद २९० वें.
कपिलेश्वर स्वामी नमन तुला । आवरेना मन ये रे ये रे झडकरिं ॥धृ०॥
सदय ह्लदय निज उदय सदोदित, ह्लदयिं करुनि देह मी-पण हें वारीं ॥क०॥१॥
नायकसी अजुनि काय पाहसि, प्रभु पाय दाखविं वय जाय कृपा करिं ॥क०॥२॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ मज, भेट देइं रे नित्य पाहुं डोळे भरी ॥क०॥३॥

पद २९१ वें.
प्रभो कपिलेश्वर महाराजा । कार्रसि तूं वास ह्लदयिं माझ्या ॥धृ०॥
वामांकि गिरिजा धरिसि सदा । नमन माझें नित्य तुझ्याचि पदा ॥म०॥१॥
जप तप साधन नाम तुझें । ना मज प्रियकर अन्य दुजें ॥म०॥२॥
विष्णु कृष्ण जगन्नाथाचा । सदोदित आपण प्रेमाचा ॥म०॥३॥

पद २९२ वें.
अखंड सुखकर श्रीगिरिजावर, प्रभु कपिलेश्वर साचा । शिवहर शंकर स्मरुनि निरंतर, प्रेम पुर:सर नाचा ॥अखंड०॥१॥
काम दहन हित राम भजनि रत, नाम स्मरणिं जयाच्या । वाम जानुवीर वाम लोचना ध्यानीं राम शिवाच्या ॥अखंड०॥२॥
विष्णु कृष्ण जगन्नाथावरि प्रेमपूर्ण सदयाचा । उदय करुनि भजनांत मेळवितो कोमल निज दासांचा ॥अ०॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP