श्री महालसेचीं पदें - पदे ३०८ ते ३०९
श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.
पद ३०८ वें.
महालसे जगदंबे करुणा दृष्टि बघुनियां पाहीं ॥धृ०॥
विषय सुखीं या नष्ट होय मति, कष्टुनि बहु व्यवसायीं । विनउनि तो स्पष्ट न करि मज, दुष्ट दुरात्मा आई ॥म०॥१॥
या त्रिभुवनीं तुजविण कवणाच्या, शरण रिघावें पायीं । चंचल मन हें निश्चल ठेवीं, स्वस्वरुपाच्या ठायीं ॥म०॥२॥
वैष्णविभक्ती कृष्ण जगन्नाथा दुभती गायी । निजानंद दुग्ध श्रवणारी, नवविध भजन उपायीं ॥म०॥३॥
पद ३०९ वें.
श्री महालसे मोहिनी नमन तुजला जय सदये ॥श्री म०॥
शमन करुनि भव संकट अंगें, रक्षिसि भक्त जनांतें ॥धृ०॥
या अवतारें त्वांचि निरसिला सकल देव असुरांचा, जइं अमृत घट निपजला । उभयपक्ष समजाविसि घालुनि दितिज्या मोह मनातें ॥श्री०॥१॥
राहसि निवांत बहु श्रमला, सच्चित्सुख पद जिव हा चुकुनियां विषयीं भजला । निज भेटीस्तव तळमळ केवळ तूं जळ मज मीनातें ॥श्री०॥१॥
वैष्णवि भक्ती कृष्ण जगन्नाथाच्या, ह्लदयिं अखंडित जागुनि मूळ समजला । त्यजुनि देह मीपण आपणांसिच शरण स्मरुनि अधिष्ठानातें ॥श्री०॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : December 16, 2016
TOP