श्री चंद्रेश्वराचीं पदें - पदे ३०१ ते ३०३
श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.
पद ३०१ वें.
शिवहर चंद्रेश्वर पूर्ण कृपा कर गा, देईं परमानंद मला ॥धृ०॥
मुनिवर तुज गाती पाळिसि तूंचि जगा । परि जिव हा बहु श्रमला ॥शि०॥१॥
स्वात्मा रज्जु वरी कल्पुनि जग भुजगा । तुज चुकला किति भ्रमला ॥शि०॥२॥
करि नमन निज जगन्नाथाचा मुलगा । कृष्णा तुझ्या पदीं रमला ॥शि०॥३॥
पद ३०२ वें.
नमन पदीं चंद्रेश्वर महाराज ॥धृ०॥
पूर्ण कृपेनें दर्शन घडलेम । धन्य दिवस माझा आज ॥न०॥१॥
पर्वत शिखरीं साच न जाचती । चढतां सज्जन पाज ॥न०॥२॥
जगन्नाथ सुत कृष्ण ह्मणे कीं । साधिं मदिछित काज ॥ नमन पदीं चंद्रेश्वर महाराज ॥३॥
पद ३०३ वें.
सुखकर चंद्रेश्वर आजी भेटला ॥धृ०॥
आत्मानुभवें भेद न वाटे । पहातां जया नयनीं जलाचा पूर लोटला ॥सु०॥१॥
ज्या स्वरुपातें निरखुनिं अवघें । निरसलें भवभय परमानंद वाटला ॥सु०॥२॥
कृष्ण जगन्नाथात्मज याला । गातां गातां महिमा ज्याचा प्रेमा दाटला ॥सु०॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : December 16, 2016
TOP