श्री नारसिंहाचीं पदें - पदे २९६ ते २९८
श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.
पद २९६ वें.
भय काय आतां मज नरहरी भेटला ॥धृ०॥
पूर्ण ज्योती चिन्मय जो कां । मिथ्या जग नटला ॥भ०॥१॥
हरला जो ह्लदयांतिल संषय । प्रेमा मनीं झटला ॥भ०॥२॥
कृष्ण जगन्नाथात्मज याला । धन्य दिवस वाटला ॥भ०॥३॥
पद २९७ वें.
जन सर्व या हो भेटूं नरहरिला ॥धृ०॥
मिथ्या हें जग जाणुनि ज्याला । संतीं दृढ धरिला ॥ज०॥१॥
आत्मज्ञान सुखें भक्तांचा जेणें भ्रम हरिला ॥ज०॥२॥
चिन्मात्रास जगन्नाथात्मज । कृष्णें आद-रिला ॥ जन सर्व या हो भेटूं नरहरिला ॥३॥
पद २९८ वें.
जय नमोस्तुते श्री नरसिंह संसार जलिधि हा फार कठिण विनवूं किती तारिं सदय ह्लदय ॥ज०॥धृ०॥
नष्ट दुष्ट किति कष्टवितो मज, स्पष्ट सांगतों जिव दमला । साच माननिं पाहतां तूंचि जननि जनक, लक्ष्मीपते हरिं हरिं भवभय ॥ज०॥१॥
प्रल्हादास्तव हिरण्य-कशिपु वधि, शरण्य आपण जनिं ठाउक । चहुं कडुनि कडकडुनि स्तंभीं प्रगटे, सुर कांपति करि भक्तांरि अभय ॥ज०॥२॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ नृहरि, तव दास पहा निज पदीं रमला । मनिं घसर होउनिं कधिं विसर न पडुं, सत्संगति वाटे जिवाहुनि प्रिय ॥ज०॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : December 16, 2016
TOP