संत लक्षण पदें - पदे १६३ ते १६४
श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.
पद १६३ वें.
तो तो सुखात्मा करि स्वहित साचें जो ॥धृ०॥
पावतां मनुष्य देह, सांडुनि वैषयिक स्नेह, विसरुनि स्त्री पुत्र गेह, श्री गुरुपदीं रत होउनि स्वरुप मात्र तो ॥तो तो०॥१॥
देखतांचि दृष्य द्वैत, कोण मी हा धरुनि हेत, आपुला आपण शोध घेत, सच्चित्सुख विवरणांसि परम पात्र जो ॥तो तो०॥२॥
विष्णु गुरु पदाब्ज भृंग, कृष्ण सेवितो असंग, चिदानंद मधु अभंग, प्राशित निज हिज उमजुनि दिवस रात्र जो ॥तो तो०॥३॥
पद १६४ वें.
राम ह्लदय गगन रवि उघड करिल त्या सुजना मी नमीं ॥धृ०॥
बिंब प्रति बिंबातें निवडुनि , ऐक्य विचारें भेद हरिल ॥त्या०॥१॥
नासुनि जगनग अंतर्ज्ञानें, आत्म कनक जो सत्य वरिल ॥त्या०॥२॥
दृष्य भास शब्द सह सांडुनि, अखंड आत्म स्फूर्ति धरिल ॥त्या०॥३॥
ग्रासुनि मीपण एकचि आपण, चिदानंद परिपूर्ण स्मरिल ॥त्या०॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथाचा, अखंड अद्वय पथ विवरिल ॥त्या०॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : December 16, 2016
TOP