मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कवी बांदरकर|
‘आनंदघनराम’ मंत्रार्या

‘आनंदघनराम’ मंत्रार्या

श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.

आहेपणे सदोदित आद्य समस्तासि सर्व व्यवहारीं ॥ आपण मीपण विरहित आधार अखंड राम निर्धारीं ॥१॥
नंदन अजात्मजाचा नंदिपतिप्रिय अपार सुखमय जो ॥ नंदवि निजभक्त स्वा - नंदानुभवेंचि मन तयास भजों ॥२॥
दर्शन सुखमय दे जो दरिद्र दु:खादि परिहरुनि सकल  ॥ दमन करुनि शत्रूचें दयाळु भक्तां न होउं दे विकळ ॥३॥
घर दारा सुत प्रिय घडि पळ मनिं एक आवडी राम ॥ घसरत न कधिं तयातें घनदाट सुखींच मिळवि सुखधाम ॥४॥
नव्विधमभक्तिपथें नव नव हर्षद आत्मभजनशीलांला ॥ न असा दीन दयाळू नरवरसुरवंद्य दावि लीलांला ॥५॥
राजाधिराज सीता राघव माझा स्वभक्त अभिमानी॥ राकाधिपप्रतिममुख रावण वधि जो सुरांसि अवमानी ॥६॥
मजवरि करूनि करुणा मन माझें स्वस्वरूपिं रमवि सदा ॥ मत्प्रिय आणिक न दुजा मन्मतिला विषयिं जाउं दे न कदा ॥७॥
आनंदघना रामा  कृष्ण जगन्नाथ विष्णुगुरु दास ॥ आठवि निज नामातें जाणुनि भक्ताश्रयात्म बिरुदास ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP