मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कवी बांदरकर|
पदे ३५४ ते ३५५

श्री इंदिराकांततीर्थ स्वामीचीं पदें - पदे ३५४ ते ३५५

 श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.

पद ३५४ वें.
श्री मदिंदिराकांत मला, एकांत सुखीं मिळवा हो । भजनि पुजनि हरि कीर्तनि रमउनि, अहंवृत्ति गळवा हो ॥श्री०॥१॥
चरण स्मरण सदोदित देउनि, मी माझें पळवा हो । देहभाव नुरउनि मन माझें, रामपदीं वळवा हो ॥श्री०॥२॥
वंशोद्धारक सेवा घडउनि, प्रेमपूर्ण कळवा हो ॥श्री०॥३॥
गुरुवर कृष्ण जगन्नाथ तुह्मां, शरण भ्रांति पळवा हो ॥श्री०॥३॥

पद ३५५ वें.
इंदिराकांत गुरु शांत मला आवडती । त्यां पदीं नित्य सद्भक्तियुक्त मत्प्रणती । मजकडुनि घडति त्यां अपराधांचि न गणती ॥इं०॥१॥
मज घडो अखंडित श्री मत्सद्नुरु सेवा । पुरवूनि मनोरथ स्फुरविल आनंद ठेवा तनु मन धन अर्पुनि अनन्य शरण गुरु देवा ॥इं०॥२॥
मज विसर न र्माळे प्रपंच चिंतन करितां । जळुं संचितपण मज कोणि न पावे मरतां । प्रभु धांव धांव गेलें फुकत वय तुज न स्मरतां ॥इं०॥३॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ गुरुपद राजीवाच्या । ध्यानीं लंपट कीं बहु अघ पद राजीवाच्या ॥इं०॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP