मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कवी बांदरकर|
पदे ३६० ते ३६१

श्रीषष्टीचीं पदें - पदे ३६० ते ३६१

 श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.

पद ३६० वें.
रवि बुधवारीं होती फेरी वदती सटि सांतेरी ग्‍ ॥धृ०॥
धवलाश्वावरिआरुढ होउनि, घेउनि सेना सारी ग्‍ । रक्षाया तव ग्राम फिरसि तूं, अजुनिहि रात्रि प्रहारीं ग्‍ ॥रवि०॥१॥
कवटाळुनि एकामेकातें, विचरुनि शोभित हारी ग्‍ । पौष्य शुक्कपक्षांत मंडपीं, गाति सुवासिनी नारी ग्‍ ॥रवि०॥२॥
घुमट टाळ मृदंग कहाळीं, वाजउनि बहुविध मेरी ग्‍ । प्रति वार्षिक उत्साह तुझा जन, करिताती निज थोरी ग्‍ ॥रवि०॥३॥
छत्र पताका स्तंभ तोरणें, सूर्य पत्र जरतारी ग्‍ । घेउनियां जन चालति मार्गीं, प्रेम जयां मनि भारीं ग्‍ ॥रवि०॥४॥
श्रृंगारुनि बहु भाविक निघतां, प्रदक्षिणेसी स्वारी ग्‍ । ग्रामवासि तुज प्रत्येक गृहीं समया ठेविति द्वारीं ग्‍ ॥र०॥५॥
गर्जति नाम मुखें त्यां तर्जुनि, पावसि तूं निर्धारीं ग्‍ । राम भजन रत भक्त सदोदित रक्षिसि वारंवारी ग्‍ ॥रवि०॥६॥
वैष्णव कृष्ण जगन्नाथ तुझ्या, आहे बहु उपकारीं ग्‍ । श्रीरामाची भक्ति घडाया, तूंचि एक सहाकारी ग्‍ ॥रवि०॥७॥

पद ३६१ वें.
श्री षष्टी देवी श्रीशांत होउनि सर्वार्थीं वश रक्षिं मज सदोदित ॥धृ०॥
ग्रामवासिजन यांसी, राम भजनि लविसी, आवडुनियां मानसिं, रामनामीं होसी रत ॥श्री०॥१॥
मोठा साक्षात्कार तुझा, भेटविला राम राजा, नवविध भक्तिकाजा, घेसी साधुनि सतत ॥श्री०॥२॥
जपसी तूं राम राम, आवडुनि पूर्णकाम, तोचि माझा नित्यनेम, चालविं अखंडित ॥श्री०॥३॥
धन्य केला आत्मग्राम, दृष्टि दाविला श्रीराम, आठविं ह्लदयीं निजनाम, कृष्ण जगन्नाथ सुत ॥श्री०॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP