मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कवी बांदरकर|
पदे २२१ ते २२६

श्री दामोदराचीं पदें - पदे २२१ ते २२६

श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.


पद २२१ वें.
सुदंर सिबिकायानीं बैसुनि दामोदर धनी आला रे ॥धृ०॥
चिन्मय हा परि धरि अवतारा, उत्साह बरा झाला रे ॥ सुं०॥१॥
दर्शन मात्रें निनवी गात्रें, होतें सुख नयनाला रे ॥सुं०॥२॥
कृष्ण जगन्नाथा-त्मज, याच्या पूर्णानंद मनाला रे ॥सुं०॥३॥

पद २२२ वें.
नमन तुज दामोदर राजा ॥धृ०॥
यथायोग्य तव भज-नहि न घडे, नकळे मज पूजा ॥न०॥१॥
निज सौख्यीं मन समरस व्हावें, साधीं या काजा ॥न०॥२॥
कृष्ण जगन्नाथात्मज सांगे, भाव जडो माझा ॥न०॥३॥

पद २२३ वें.
बहु देवीं देव एक । महाकालि श्री चामुंडेश्वरि ऐश्या मूर्ति अनेक ॥धृ०॥
निजानंद परमात्मा भरला, करणें हाचि विवेक ॥ब०॥१॥
सर्वाधार जगाचा साक्षी, विसरुं नको नावेक ॥ब०॥२॥
निर-हकारे कृष्ण विनवितो, जगन्नाथ द्विज लेक ॥ब०॥३॥

पद २२४ वें.
तव पद कमलीं मी भृंगरसें रमवीं श्री दामोदर सखया ॥धृ०॥
त्रिगुणात्मक माया गांजिति हे शमवीं, जगदात्मा वारिं भया । त०॥१॥
बहु चंचल हें मन विषय सुखीं भ्रमवी, फिरवि जसा घट नभ या ॥त०॥२॥
निज जगन्नाथ सुत कृष्णपणा दमवीं, विघड हरीं जो उभया ॥त०॥३॥

पद २२५ वें.
मनुजा रामनाथ लक्ष्मी नारायण दामोदर तिघेहि एकचि गा ॥धृ०॥
भेद मनीं जरि किमपि धरिसि तरि, मारुनि घेसि दगा ॥म०॥
निज चैतन्याधार जगीं या, जेवीं कनक नगा ॥म०॥२॥
वदतो कृष्ण जगन्नाथात्मज, पालक तोचि जगा ॥म०॥३॥

पद २२६ वे.
निशिदिनिं दामोदरा स्मरुनि कांहिं या जन्मीं तरि उद्धरा ॥धृ०॥
बहु सायासें मानव देहीं, आले निश्चय धरा ॥स्म०॥१॥
धन सुतदारा मोह पसारा, होय अशाश्र्वत खरा ॥स्म०॥२॥
कृष्ण जगन्नाथात्मज विनवी, जोडुनियां द्वय करा ॥स्म०॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP