मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कवी बांदरकर|
अभंग

अभंग

श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.

आम्हा उणे  काय सदय आला रामराजा । स्वभक्त समाजा संरक्षी जो ॥१॥
नंदी वाहन प्रिय नंदवी सज्जन । तयासी लक्षीन अंतर्द्दष्टी ॥२॥
दरती जयासी दैत्य दर्शने पातकी । मुक्त हे त्रिलोकी स्मरणें ज्याच्या ॥३॥
घनश्याम राम स्वरुपीं घन दाट प्रकाश । मुळीं चिकाकाश जो परमात्मा ॥४॥
नव नव हर्षद नम्र भक्तांतरा । वंदीन सदारा त्या श्रीरामा ॥५॥
राम भक्तांचा कैवारी राक्षसांसी वाघ । जेणें दुष्ट संघ मर्दीयेला ॥६॥
मनामाजी स्फुरवी सुख मज ज्याचें नाव । कळवि आत्म गांव आत्म भक्तां ॥७॥
आनंदघना रामा विष्णू कृष्ण जगन्नाथा । वरहस्त माथा ठेउनि तारीं ॥८॥
या अभंगात २ वेळा ‘आनंदघन राम’ व २ वेळा ‘जानकीश राघव’ हे मंत्र आले आहेत.


॥ अभंग ॥

श्री समर्थ वैष्णव सद्‌गुरु पिता रामराजा । सीता लक्ष्मी भाजा माता माझी ॥१॥
रात्रदिवस करिती मज सुख समुद्रींलीन । प्राण संजीवन जयांचेनी ॥२॥
मज कळवी परमा - र्थ भला विषयिं ठकाठकी । निजात्म विवेकी तोची धन्य ॥३॥
दाशरथी माझी वाहे सर्वही काळजी । साधी भजकांजी इच्छा सिद्धि ॥४॥
सर्वदा सद्भक्ती - युक्तां कळवि आत्म ठाव । प्रभुराम राव त्रैलोक्याचा ॥५॥
माया समुद्र हा तरवी करितां निज ध्यान । स्वात्म सुख ज्ञान फळवी भक्तां ॥६॥
रूपें विश्व सद्रुप नटला शुक्ती चिन्मय सारा । त्रैलोक्य पसारा रामसाचा ॥७॥
तीर्थचें माहेर यश ज्याचें गोड नाम । होती पूर्ण काम गातां वाचे ॥८॥
रामविष्णू कृष्ण जगन्नाथ सच्चित्सूख ॥ तन्मय सन्मूख मारुति ज्याच्या ॥९॥

या अभंगांत १ वेळा ‘जानकी जीवन राम’ १ वेळा ‘समर्थ वायु तनय’ व एक वेळा ‘श्री रामदास मारुती” हे मंत्र आले आहेत.

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP