मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|श्रीनारदभक्तिसूत्रें|
सूत्र ५

श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ५

नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.


भक्तांसी भगवतदर्शन । उपजवी नित्य समाधान । इतर विषयांची वांच्छा कोण । धरील तेथ सांग पा ॥१०१॥
विषयांची वांच्छा नाहीं । चिंतनही न घडे कांही । प्राप्त झालिया द्वेष नाहीं । जग अखिल मद्रूप ॥१०२॥
भक्तांसी विषय भोगितां । लपंटतां नये सर्वथा । सुखालागीं धडपडतां । दिसों न येति अणुमात्र ॥१०३॥
नटवेषें राज्य करितां । किंवा कारागृहीं सापडतां । सुखदु:खाची वार्ता तत्वतां । न शिवे तयासी यत्किंचित ॥१०४॥
मृगजळाची आस । कोण धरील सूज्ञ मनुष्य । कां ठाकिलियाही संतोष । कोण मानील निश्चयें ॥१०५॥
यालागीं भगवद्भक्त । विषयांते न वांच्छित । प्राप्त झालिया नाव्हेरित । नाहीं रमत ते ठायीं ॥१०६॥

N/A

References : N/A
Last Updated : November 15, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP