मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|श्रीनारदभक्तिसूत्रें| सूत्र २४ श्रीनारदभक्तिसूत्रें स्तवन सूत्र १ सूत्र २, ३ सूत्र ४ सूत्र ५ सूत्र ६ सूत्र ७ सूत्र ८ सूत्र ९ सूत्र १० सूत्र ११ सूत्र १२ सूत्र १३ सूत्र १४ सूत्र १५ सूत्र १६ सूत्र १७ सूत्र १८ सूत्र १९ सूत्र २० सूत्र २१ सूत्र २२ सूत्र २३ सूत्र २४ सूत्र २५ सूत्र २६ सूत्र २७ सूत्र २८ सूत्र २९ सूत्र ३० सूत्र ३१ सूत्र ३२ सूत्र ३३ सूत्र ३४ सूत्र ३५ सूत्र ३६ सूत्र ३७ सूत्र ३८ सूत्र ३९ सूत्र ४० सूत्र ४१ सूत्र ४२ सूत्र ४३ सूत्र ४४ सूत्र ४५ सूत्र ४६ सूत्र ४७ सूत्र ४८ सूत्र ४९ सूत्र ५० सूत्र ५१ सूत्र ५२ सूत्र ५३ सूत्र ५४ सूत्र ५५ सूत्र ५६ सूत्र ५७ सूत्र ५८ सूत्र ५९ सूत्र ६० सूत्र ६१ सूत्र ६२ सूत्र ६३ सूत्र ६४ सूत्र ६५ सूत्र ६६ सूत्र ६७ सूत्र ६८ सूत्र ६९ सूत्र ७० सूत्र ७१ सूत्र ७२ सूत्र ७३ सूत्र ७४ सूत्र ७५ सूत्र ७६ सूत्र ७७ सूत्र ७८ सूत्र ७९ सूत्र ८० सूत्र ८१ सूत्र ८२ सूत्र ८३ सूत्र ८४ नारदभक्तिसूत्र विवरण श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र २४ नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे. Tags : keshavraj deshamukhnaradtranslationअनुवादकेशवराज देशमुखनारद ॥ नास्त्येव तस्मिन् तत्सुखसुखित्वम ॥२४॥ Translation - भाषांतर जारप्रेमाचें ठायीं । विषयसुखावाचूनि नाहीं । सुखभोग आपुलिया ठायीं । जार केवळ निमित्तमात्र ॥२६४॥तो जरी सुख न देतां । तरी प्रेमाची दूर वार्ता । तोचि दु:ख देऊं लागतां । प्रेम विरघळे तात्काळ ॥२६५॥जारावरी प्रेम करिती । किंचित काल आराधिती । पाठीं तयासीच वधिती । प्रतिकूल वाटों लागतां ॥२६६॥जारजरिणीचें प्रेम । तो केवळ विषयभ्रम । अंतीं नरकवास दारुण । भोगितां कांहीं चुकेना ॥२६७॥जारासाठीं जारावरी । प्रेम कोणीही न करी । सर्वांचें प्रेम आपणावरी । आपणालागीं प्रिय सर्व ॥२६८॥दुसर्याचें सुखें सुखी होणें । देहसुखासी तुच्छ लेखणें । हीं तो तत्वज्ञांचीं लक्षणें । असामान्यपणें नांदती ॥२६९॥गोपिस्त्रियांची ऐसी स्थिति । कृष्णसुखें सुख मानिती । विषयभोगाची खंती । नाहीं चित्तीं अणुमात्र ॥२७०॥कृष्ण परमत्मा परंज्योती । त्याची अंतरीं जडली प्रीति । त्याच्या सुखें सुखी होती । भोगेच्छा संपूर्ण निमाली ॥२७१॥यालागीं जारप्रेम म्हणों नये । आत्मारामीं जडली सोय । नित्य कृष्णस्वरूपीं तन्मय । होऊनि त्या राहिल्या ॥२७२॥ N/A References : N/A Last Updated : November 16, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP