मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|श्रीनारदभक्तिसूत्रें|
सूत्र ३६

श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ३६

नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.


मनाचा स्वभाव मनन । कांही तरी नित्य चिंतन । करीत राहे तेणेंविण । असतांचि नये तयासी ॥३५८॥
विषयचिंतने विषयाकार । होऊनि राहे निरंतर । विषयलोभ उपजवीं अपार । भोगकर्दभीं लोळवी ॥३५९॥
नाना आपदा भोगवी । दुर्गतिमाजी सांपडावी । अंति नरकाची वाट दावी । दुर्निवारपणें दुर्घट ॥३६०॥
विषयचिंतनाचें निवारण । व्हावयालागीं ईश्वरस्मरण । साधुसंतीं प्रतिपादिलें जाण । ईश्वरही स्वयें बोलिलें ॥३६१॥
तस्मात् सर्वेषु कालेषु । हरिचिंतन करी विशेषु । स्वकर्तव्याचा आळसु । कहीं न केला पाहिजे ॥३६२॥
अखंड चिंतन ईश्वराचें । नयनीं श्रोत्री ध्यान त्याचें । अंतर्बहिर्मनोवाचें । न विसंबावें तयासी ॥३६३॥
विषयांसी इयापरी । हरिरूप करणें निर्धारीं । चिंतनें चिंतनें साक्षात्कारीं । चढिजे दृढ अभ्यासें ॥३६४॥
ऐसे हें अखंडित भजन । सर्वकाळ हरिस्मरण । निर्विषयत्व व्हावया कारण । साधन दुसरें बोलिलें ॥३६५॥
परि हें साधन ज्याचें त्यासी । करणें न कळत कोणासी । वृत्ति पावूनि निवृत्तिसी । परम पदा पाववी ॥३६६॥

N/A

References : N/A
Last Updated : November 18, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP