श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ४१
नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.
संत कोण आणि असंत कोण । तें तोचि जाणे परिपूर्ण । येरांसी अशक्य ओळखण । कठीण खूण तयांची ॥४०८॥
संत जाणती ईश्वरासी । ईश्वर जाणे संतासी । एकात्मकता दोघांची ऐसी । अभेदरूपें नांदती ॥४०९॥
संत ओळखती देवासी । देव जाणे संतांसी । दोहोंमध्यें भेदासी । पाहों जातां न सांपडे ॥४१०॥
यालागीं संतदर्शन । व्हावया मुख्य हरिभजन । हेंचि बोलिलें श्रेष्ठ साधन । सकल संत संमति ॥४११॥
N/A
References : N/A
Last Updated : November 24, 2015
TOP