मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|श्रीनारदभक्तिसूत्रें|
सूत्र ४०

श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ४०

नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.


संताची भेटी व्हावया । ईश्वरकृपा लागे साधावया । त्याचे प्रसादें लवलाह्या । होय दर्शन तयाचें ॥४०५॥
जाणत अथवा अजाणतपणें । ईश्वरसेवा करीत जाणे । तरीच निश्चयात्मकपणें । तो भेटवी तयासी ॥४०६॥
आपुलें मति पाहों जातां । संतअसंत नये निवडितां । परि ते जाणों येईल तत्वतां । मध्यस्थीनें तयाचें ॥४०७॥

N/A

References : N/A
Last Updated : November 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP