श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ७३
नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.
ईश्वर सर्वांठायी एक । गुणदोषाची नाहीं भाक । त्यासी प्रेम जडतां देख । स्वरूप लाभे तयाचें ॥८७८॥
तो स्वये सच्चिदानंदघन । त्याचें जडलिया अनुसंधान । मन बुध्दि इंद्रिये प्राण । भजनीं लागति तयाच्या ॥८७९॥
देहासकट आपण । होय परब्रह्म वस्तु पूर्ण । कांहीं न पडे तेथें न्यून । ऐसा जाणा निश्चय ॥८८०॥
तदीय जे झाले । ते तद्रूपतसी पावले । वादासी कारण नुरले । प्रत्यक्षता प्रमाण ॥८८१॥
N/A
References : N/A
Last Updated : November 24, 2015
TOP