मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|श्रीनारदभक्तिसूत्रें|
सूत्र २९

श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र २९

नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.


भक्तिवांचोनि ज्ञान नाहीं । ऐसेंही बोलती कांही । तेही साचचि पाहीं । एकेपरी विचारतां ॥३००॥
तहानेवांचून जळ नाहीं । भुकेवांचूनि अन्न नाहीं । ऐसें कोणी म्हणतां कांही । अन्यथा म्हणों येईना ॥३०१॥
अंतरी असेल तळमळ । तरीच ज्ञान लाभेल सोज्वळ । एकावीण एक निष्फळ । ऐसें उघड जाहलें ॥३०२॥
या दोहींचा विचार पाहतां । अन्योन्य सापेक्षता । दिसों आली आम्हां तत्वतां । परि सिध्दांत तो वेगळाची ॥३०३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 16, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP