मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|श्रीनारदभक्तिसूत्रें| सूत्र ३९ श्रीनारदभक्तिसूत्रें स्तवन सूत्र १ सूत्र २, ३ सूत्र ४ सूत्र ५ सूत्र ६ सूत्र ७ सूत्र ८ सूत्र ९ सूत्र १० सूत्र ११ सूत्र १२ सूत्र १३ सूत्र १४ सूत्र १५ सूत्र १६ सूत्र १७ सूत्र १८ सूत्र १९ सूत्र २० सूत्र २१ सूत्र २२ सूत्र २३ सूत्र २४ सूत्र २५ सूत्र २६ सूत्र २७ सूत्र २८ सूत्र २९ सूत्र ३० सूत्र ३१ सूत्र ३२ सूत्र ३३ सूत्र ३४ सूत्र ३५ सूत्र ३६ सूत्र ३७ सूत्र ३८ सूत्र ३९ सूत्र ४० सूत्र ४१ सूत्र ४२ सूत्र ४३ सूत्र ४४ सूत्र ४५ सूत्र ४६ सूत्र ४७ सूत्र ४८ सूत्र ४९ सूत्र ५० सूत्र ५१ सूत्र ५२ सूत्र ५३ सूत्र ५४ सूत्र ५५ सूत्र ५६ सूत्र ५७ सूत्र ५८ सूत्र ५९ सूत्र ६० सूत्र ६१ सूत्र ६२ सूत्र ६३ सूत्र ६४ सूत्र ६५ सूत्र ६६ सूत्र ६७ सूत्र ६८ सूत्र ६९ सूत्र ७० सूत्र ७१ सूत्र ७२ सूत्र ७३ सूत्र ७४ सूत्र ७५ सूत्र ७६ सूत्र ७७ सूत्र ७८ सूत्र ७९ सूत्र ८० सूत्र ८१ सूत्र ८२ सूत्र ८३ सूत्र ८४ नारदभक्तिसूत्र विवरण श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ३९ नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे. Tags : keshavraj deshamukhnaradtranslationअनुवादकेशवराज देशमुखनारद ॥ महत्संगस्तु दुर्लभोऽगम्योऽमोघश्च ॥३९॥ Translation - भाषांतर परी ते संतभेटी अति दुर्लभ । सहज हातां नये सुलभ । जन्मांतरीचा ऋणानुबंध । असेल तरीच लाभेल ॥३९३॥किंवा ईश्वराची सेवा घडेल । त्यासी करुणा जरी उपजेल । तरीच तो प्रेरणा करील । योग्य स्थळीं जावया ॥३९४॥संतासन्निध जरी राहिले । अश्रध्देमुळें दूर जाहले । ऐसेंचि बहुतेकांसी घडलें । दिसो येतें प्रत्यक्ष ॥३९५॥जयाची भावना जैसी । तया संगति घडे तैसी । जवळी असोनि नाहीं ऐसी । बुध्दि लागे उपजों ॥३९६॥आस्था असेल जयासी । संत येवोनि भेटती त्यासी । आस्था असेल मानसीं । तरी जवळीं असतां अगोचर ॥३९७॥संतपण नव्हे वेषावरी । तेथें ज्ञाना अज्ञाना नये सरी । नीच उच्च भावना सारी । गुंडून लागे ठेवावी ॥३९८॥संतपण नये मोल देतां । किंवा देशोदेशीं हिंडतां । स्वर्ग मृत्यु पाताळीं । धुंडितां नये हाता कोणाच्या ॥३९९॥संतभेटीची तळमळ । साधन तेंचि एक केवळ । त्यांवाचून सर्व पोकळ । केले ठरती उपाय ॥४००॥ईश्वराची सेवा करितां । मनोभावें त्यासि पूजितां । तो होय प्रसन्न वरदाता । आणोनि भेटवीं संतासी ॥४०१॥त्याचे प्रसादें तळमळ । तोचि उपजवी सर्वकाळ । तळमळीचें तेंचि फळ । संतदर्शन अमोघ ॥४०२॥संतदर्शन नवजे वाया । कृपा करिती वरी जया । तोही होय समान तया । ऐसा महिमा तयांचा ॥४०३॥संतकृपा झाली जयावरी । ते पावले परब्रम्ह साक्षात्कारी । परी वांया गेले चराचरी । ऐसें नाहीं ऐकिलें ॥४०४॥ N/A References : N/A Last Updated : November 24, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP