श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ७१
नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.
ऐशा तन्मयातें देखोनि । पितर होती संतुष्ट मनीं । नाचों लागती देवता श्रवणीं । कीर्ती ऐकोन तयांची ॥८४९॥
पृथ्वी माताही जाणोन । ऐसा सत्पुत्र जन्मला म्हणोन । धन्य मानीत आपणाआपण । म्हणे सनाथ झालें मी ॥८५०॥
पितरांसी कव्य भाग । देवतांसी हव्य भाग । मिळालिया घडे योग । सर्वत्र सुसमृध्दिचा ॥८५१॥
देव पितरांचे आशिर्वादें । सृष्टिमाजी सुख नांदे । सकल प्रजा स्वानंदें । संपूर्ण होऊनि राहति ॥८५२॥
सकल जग होय सुखी । ऐसिया भक्तांचिया देखी । भक्त तोचि ईश्वर लेखी । धरा माता प्रसन्न होय ॥८५३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 24, 2015
TOP