मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|श्रीनारदभक्तिसूत्रें|
सूत्र ३३

श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ३३

नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.


आतां मुमुक्ष तो कोण । ज्यासी मोक्षाचीच लागली तहान । इतर इच्छा गौण । कार्याकारण रहिल्या ॥३२०॥
मोक्षाचीच तीव्र कांक्षा । त्याच नांव मुमुक्षा । क्वचित कोठें येईल लक्षा । जरी भाषा बोलतां सुलभ ॥३२१॥
मोक्ष तरी काशास म्हणावें । तेंही लागे धुंडाळावे । शब्दाचें अवघड गोवे । उकलितां कठिण ॥३२२॥
कोणी म्हणती मोक्षाचि नाहीं । मोक्षाची ते चाड नाहीं । बहुतेक विषयांचे डोही । राहिले पडोनि नि:शंक ॥३२३॥
विषय भोगितां दु:ख होय । तेवढें सर्वांसी अप्रिय । दु:खविरहित विषयांची सोय । हीच आवडी सकळिकां ॥३२४॥
परि हें कदापि न घडे । विषय भोगितां दु:खावर पडे । अनिच्छयाही होणें घडे । ठाऊके आहे सर्वांसी ॥३२५॥
भोगापाठीं दु:ख । जडलें असे आवश्यक । दु:ख विरहित भोगसुख । न दिसे न ये अनुभवा ॥३२६॥
दु:खाची आत्यंतिक निवृत्ति । आणि निरतिशयानंदावाप्ति । हेचि एक मोक्षस्थिती ग्रंथातरी वर्णिली ॥३२७॥
हें जरी नये अनुभवा । तरी सर्वाशीच तयाचा हेवा । जाणत अजाणतपणें जीवा । तेंच व्हावें निश्चयेसीं ॥३२८॥
यालागीं जग सर्व मोक्षाकांक्षी । असोनि उपायातें कोणी न लक्षी । नारद बोलिले ते पक्षी ।
हितार्थ मानवजातीच्या ॥३२९॥
जयासि मोक्षचि व्हावा । तो मुमुक्षु ऐसा जाणावा । तेणें भक्तीचा मार्ग धरावा । तेणेचिं कार्य साधेल ॥३३०॥
भक्ति प्रिय ईश्वरासी । तो तंव सुखाचीच राशी । शाश्वत सुख देऊनि सर्वासी । दु:खसंकट निवारी ॥३३१॥
म्हणोनि सर्वाशीं ग्राह्यभक्ति । भक्तिनें लाभेल मुक्ति । तयालागीं साधन व्युत्पत्ति । तेचि पुढें बोलिली ॥३३२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 16, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP