मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|श्रीनारदभक्तिसूत्रें|
सूत्र ५७

श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ५७

नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.


भक्तिचे हे वर्णिले प्रकार । एकाहून एक थोर । सहेतुकत्वें अज्ञान घर । न सांडोनि राहति ॥६३१॥
परि तामसाहोनि राजसास । राजसाहोनि सात्विकास । योग्यता जाणोनि विशेष । श्रेयस्करता बोलिली ॥६३२॥
अर्थार्थी भक्त सामान्य । त्याहून जिज्ञासू अधिक मान्य । जिज्ञासूमाजी तोचि धन्य । आर्त म्हणोनि सांगितला ॥६३३।
परि हे सर्व प्रकार । गौणी भक्तिचेच आधार । मुख्य भक्तिचा मार्ग सुकर । करूनि दाविति निश्चयें ॥६३४॥
घडत घडत सर्व घडतें । होतां होतां साधों येतें । क्रमाक्रमानें गाठों येतें । शिखर भक्तिमंदिराचें ॥६३५॥
म्हणोनि हे सर्वही उपकारक । जीवासी कल्याणकारक । कवण्यां मिषें ईश्वरसन्मुख । करोनि काळें उध्दरिती ॥६३६॥
कवण्या एकें निमित्तें । चित्त ईश्वरीं जडों लागतें । ईश्वररूप होऊनि जातें । सदा चिंतन केलिया ॥६३७॥

N/A

References : N/A
Last Updated : November 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP