श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ५२
नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.
विरळा ऐसा अनुभवी । अनुभवें भोगी स्वानंद पदवी । इतरांसीही अनुभव दावी । स्वयें भोगिल्या स्थितीचा ॥५३९॥
परी शब्दानें सांगणें कठीण । अनुभवी तेचि जाणती खूण । शब्द राहिला कुंठीत होऊन ।
बोल बोलतां अबोलपणा ॥५४०॥
शर्करेची स्वाद गोडी । नये सांगतां दावितां उघडी । परी मुखीं पडतां तेचि घडी । कळों येईल सर्वासीं ॥५४१॥
बोलणारासी बोलतां नये । न बोलतां जो मूक होय । तो वर्णू शकेल काय । अगम्य कळा तेथिची ॥५४२॥
यालागीं अनुभवचि येथ प्रमाण । न चले काहीं अनुमान । क्वचित एखादा पावेल खूण । तोचि जाणोनि राहिला ॥५४३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 24, 2015
TOP