श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ६२
नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.
मनाविरुध्द कांही घडलें । तरी कर्तव्य आपुलें पाहिजे केलें । तें न सांडितां होय भले । कालांतरें सकळही ॥६७२॥
लौकिक व्यवहारानुसार । कृति करावी साचार । तेथ न चुकतां अणुमात्र । कार्य साधे लवलाही ॥६७३॥
व्यवहारीं असावें कुशल । लागों न द्यावा कांही मळ । मन बुध्दि अर्पूनि सकळ । ईश्वरभावना राखावी ॥६७४॥
सकल विश्व भगवदरूप । देखोनि सेवा करावी अमूप । हर्षामर्श भय संकल्प । सांडूनि द्यावें सकळ ॥६७५॥
कर्तव्य करीतचि राहावें । ईश्वरसेवा जाणोनि रमावें । तेणें तयासी तोषवावें । हाचि धर्म बोलिला ॥६७६॥
फलाशा मनीं न धरावी । तयासी सकल कर्मे अर्पावी । सिध्दि असिध्दि मनीं नाणावी । तो करील तें प्रमाण ॥६७७॥
तो करील तेंचि भलें । तो देईल तेंचि आपलें । ऐसा निर्धार ठेवूनि केलें । तरी तेंच फलद्रूप ॥६७८॥
ऐसिया भावना कर्म करितां । लाभे ईश्वराची प्रसन्नता । सर्वकाळ सार्थकता । होय केल्या न केल्याची ॥६७९॥
सर्व काहीं त्याचेनि घडतें । फल अर्पावें त्याचें तयातें । मन गुंतों न द्यावें । तेणेचि होय साफल्य ॥६८०॥
N/A
References : N/A
Last Updated : November 24, 2015
TOP