मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|श्रीनारदभक्तिसूत्रें|
सूत्र १७

श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र १७

नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.


पूजेचे ठायीं अनुराग । जरी वाढिन्नला सवेग । तरी भजनकीर्तनाचा रंग । नित्य नवा निरुपम ॥२२१॥
हेंही भक्तिचें लक्षण । गर्गाचार्य बोलिले अनुलक्षून । सर्वासी साध्य व्हावयालागून । गीता भागवत संमत ॥२२२॥
माझें कीर्तन भजन करिती । त्यांसी विकलों मी श्रीपती । नामस्मरणापरती भक्ति । आणिक नाहीं त्रिभुवनीं ॥२२३॥
अखंड चिंतन हेंचि सार । ऐसें उभारुनिया कर । दोन्हीं ग्रंथीं वदले साचार । श्रीकृष्ण भगवान कळवळोनि ॥२२४॥
हृदयस्थ जो नारायण । तो जागृत व्हावया जाण । अखंड चिंतन हेंचि साधन । सर्व संत निरूपती ॥२२५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 16, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP