श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र १८
नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.
शांडिल्य ऋषिचें ऐंसें मत । आत्मज्ञानें असावें निश्चित । तरीच भक्ति बोलिजत । मान्य होय ईश्वरासी ॥२२६॥
ईश्वर प्राणिमात्रांचे हृदयीं । संचरोनि राहिला ठायीं । तयासी नेणता जें काहीं । केलें तें सर्व निष्फळ ॥२२७॥
हृदयस्थासी ओळखावें । जाणोनि सर्वकाळ रमावें । रमतां रमतां होऊनि रहावें । तोचिं स्वयें आपण ॥२२८॥
ईश्वर होऊनि ईश्वरातें । भजावें हेंचि लक्षण निरुतें । शांडिल्यऋषी झाले बोलते । तत्वज्ञान निर्णय ॥२२९॥
N/A
References : N/A
Last Updated : November 16, 2015
TOP