मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|श्रीनारदभक्तिसूत्रें| सूत्र ५४ श्रीनारदभक्तिसूत्रें स्तवन सूत्र १ सूत्र २, ३ सूत्र ४ सूत्र ५ सूत्र ६ सूत्र ७ सूत्र ८ सूत्र ९ सूत्र १० सूत्र ११ सूत्र १२ सूत्र १३ सूत्र १४ सूत्र १५ सूत्र १६ सूत्र १७ सूत्र १८ सूत्र १९ सूत्र २० सूत्र २१ सूत्र २२ सूत्र २३ सूत्र २४ सूत्र २५ सूत्र २६ सूत्र २७ सूत्र २८ सूत्र २९ सूत्र ३० सूत्र ३१ सूत्र ३२ सूत्र ३३ सूत्र ३४ सूत्र ३५ सूत्र ३६ सूत्र ३७ सूत्र ३८ सूत्र ३९ सूत्र ४० सूत्र ४१ सूत्र ४२ सूत्र ४३ सूत्र ४४ सूत्र ४५ सूत्र ४६ सूत्र ४७ सूत्र ४८ सूत्र ४९ सूत्र ५० सूत्र ५१ सूत्र ५२ सूत्र ५३ सूत्र ५४ सूत्र ५५ सूत्र ५६ सूत्र ५७ सूत्र ५८ सूत्र ५९ सूत्र ६० सूत्र ६१ सूत्र ६२ सूत्र ६३ सूत्र ६४ सूत्र ६५ सूत्र ६६ सूत्र ६७ सूत्र ६८ सूत्र ६९ सूत्र ७० सूत्र ७१ सूत्र ७२ सूत्र ७३ सूत्र ७४ सूत्र ७५ सूत्र ७६ सूत्र ७७ सूत्र ७८ सूत्र ७९ सूत्र ८० सूत्र ८१ सूत्र ८२ सूत्र ८३ सूत्र ८४ नारदभक्तिसूत्र विवरण श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ५४ नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे. Tags : keshavraj deshamukhnaradtranslationअनुवादकेशवराज देशमुखनारद ॥ गुणरहितं कामनारहितं प्रतिक्षणवर्धमानमविच्छिन्नं सूक्ष्मतर्मनुभवरूपम ॥५४॥ Translation - भाषांतर तेथें नाहीं गुणसंबंध । सात्विक राजस तामस भेद । द्रव्यगुण कल्पनेचा बाध । सहज होऊन राहिला ॥५५३॥भगवान स्वयें गुणरहित । हृदयामाजी नित्य नांदत । सर्वगुणांहून अलिप्त । स्वयंप्रकाश स्वरूपें ॥५५४॥तैसेंचि त्याचे प्रेम जाणा । तद्रूप होऊन अनुभवा आणा । गुणागुणांची विवंचना । राहिली तेथें लाजोनि ॥५५५॥म्हणोनि बोलिजे गुणरहित । गुण साक्षित्वें नित्य वर्तत । तीही ऋतुसी न स्पर्शत । आकाशापरि अलिप्त ॥५५६॥तैसिचि तें कामना रहित । कामना मनामाजी उपजत । मनजी उन्मन झालें जेथ ।कामना कैचि त्या ठाई ॥५५७॥कामना तरी वैषयिक । द्वंद्वंसंबंधे होय बाधक । आत्मा निरामय निर्विषयक । कामना कैसी उपजेल ॥५५८॥आपुलिचि कामना आपणासी । उपजिवितां नये कोणासी । न उपजिवितां आत्मसिध्दिसी । नव्हे बाधक सर्वथा ॥५५९॥जैसी सूर्याचें ठायीं । दीपसिध्दि नलगे कांहीं । अस्तमानाचें नांव नाहीं । नित्य उदित प्रकाशें ॥५६०॥तैसें प्रेम जें भगवदरूप । तेथें कामनेचा होय लोप । सहज निष्काम आपेंआप । तेंचि स्वरूप तयाचें ॥५६१॥त्या प्रेमाचें ऐसें लक्षण । वाढों लागे क्षणोक्षण । न तुटे कधीं न होय जीर्ण । आपुलेपण भोगवी ॥५६२॥विषयप्रेमें विषयाकार । आत्मप्रेमें आत्माकार । स्वस्वरूपाचा सत्य निर्धार । वृत्तिरहित अवस्था ॥५६३॥विषयप्रेम लयासि जातें । भगवदप्रेम वाढों लागतें । अविच्छिन्नपणें नांदतें । एकवार उपजलिया ॥५६४॥तयाचा हाचि विशेष । कधीं पावों नेणें नाश । अविरतपणें सावकाश । नांदे आपुलिया ठायीं ॥५६५॥आतां सूक्ष्मतर ऐसें म्हणणें । तेंही सांगों कवण्यागुणें । स्थूल इंद्रिया विरहितपणें । आपुले आपण जाणावीं ॥५६६॥विषयभोगी जें प्रेम उपजत । तें स्थूलपणें अनुभवा येत । विषयसंबंध विरहित । तें सूक्ष्म ऐसें म्हणावें ॥५६७॥निर्विषय झालिया चित्त । आपुलेपणें जें होय उदित । तेंचि सूक्ष्मतर म्हणों येते । अनुभवितां अनुभवें ॥५६८॥अनुभव तो वर्णवेना । प्रेम तें दावितां येईना । प्रेम अनुभव एकचि जाणा । स्वसंवेद्यस्वरूपें ॥५६९॥ N/A References : N/A Last Updated : November 24, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP