श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र २८
नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.
या भक्तीचें साधन ज्ञान । ऐसें कांही म्हणती जन । ईश्वरासी ओळखिल्याविण । नव्हे भक्ति तयाची ॥२९७॥
पत्ता ठाऊका असेल जरी । पत्र पोचलें ते तरी । एरव्ही सर्व लेखन सामुग्री । मेळवूनि वायां जाईल ॥२९८॥
जयाची भक्ति करावी । माहिती त्याची प्रथम व्हावी । न होनि कासया शिणवावी । काया वाचा मनबुध्दि ॥२९९॥
N/A
References : N/A
Last Updated : November 16, 2015
TOP