मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|श्रीनारदभक्तिसूत्रें|
सूत्र ४४

श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ४४

नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.


दु;संगतिचा परिणाम । मनामाजी वाढवी काम । विषय वासनेचा संभ्रम । नित्य करी व्याकुळ ॥४४२॥
भोग भोगावे निरंतर । तयालागीं मन आतुर । तेंचि ध्यान धरूनि अंतर । विषयाकार जाहलें ॥४२३॥
विषयसुख क्षणभंगुर । तयालागीं भुलले पामर । विसरोनियां अपापर । लुब्ध होऊनि राहती ॥४२४॥
इच्छेनुसार भोगप्राप्ति । ऐसें घडे कल्पांतीं । परि वासना अनावर होती । क्षोभ उपजिविती मनासी ॥४२५॥
सर्वकाळ तोचि ध्यास । भोग भोगणें हा हव्यास । न मिळतां चित्त उदास । क्रोधाविष्ट त्यागुणें ॥४२६॥
क्रोधापरिस शत्रु नाही । घायाळ केले अहिमही । लहानथोर नाडिले पाही । विवेकभ्रष्ट करोनि ॥४२७॥
अकल्पित घाला घाली । शाहाण्यासी पाडितो भुली । तेणें मति भांबावली । प्रमादीं करी प्रवृत्त ॥४२८॥
तयाचि परि मोह जाण । तेणें असत्यासी सत्यपण । अप्रमाणासी मानिलें प्रमाण । जाहला वंचक सर्वाचा ॥४२९॥
तयासी नाहीं लहानथोर । जाणा नेणां करी जर्जर । अर्जुनापरिस भक्त थोर । क्षणांमाजि कवळिलें ॥४३०॥
ऐसिया बुध्दिभ्रंशाकरण । स्मृतिभ्रंश मूळ जाण । कर्तव्याकर्तव्याचें विस्मरण । तेणें जाहलें जीवासी ॥४३१॥
कोण मी काय करावें । संसारीं कैसें वर्तावें । तें मना नये आघवे । अखंड वृत्ति बर्हिमुख ॥४३२॥
विषयावाचून कांही । जगामाजी सुखचि नाहीं । ऐसिये बुध्दिचे प्रवाहीं । पडोनि गेले वाहत ॥४३३॥
नाहीं ईश्वराचें स्मरण । धर्माधर्माची ओळखण । पापपुण्याचें विस्मरण । होऊनि ठेलें सर्वकाळ ॥४३४॥
याचें नांव स्मृतिभ्रंश । जेथें झाला बुध्दिनाश । तेणेचिं ओढवला सर्वनाश । दुष्टसंगतिस्वभावें ॥४३५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP