मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|श्रीनारदभक्तिसूत्रें| सूत्र ६१ श्रीनारदभक्तिसूत्रें स्तवन सूत्र १ सूत्र २, ३ सूत्र ४ सूत्र ५ सूत्र ६ सूत्र ७ सूत्र ८ सूत्र ९ सूत्र १० सूत्र ११ सूत्र १२ सूत्र १३ सूत्र १४ सूत्र १५ सूत्र १६ सूत्र १७ सूत्र १८ सूत्र १९ सूत्र २० सूत्र २१ सूत्र २२ सूत्र २३ सूत्र २४ सूत्र २५ सूत्र २६ सूत्र २७ सूत्र २८ सूत्र २९ सूत्र ३० सूत्र ३१ सूत्र ३२ सूत्र ३३ सूत्र ३४ सूत्र ३५ सूत्र ३६ सूत्र ३७ सूत्र ३८ सूत्र ३९ सूत्र ४० सूत्र ४१ सूत्र ४२ सूत्र ४३ सूत्र ४४ सूत्र ४५ सूत्र ४६ सूत्र ४७ सूत्र ४८ सूत्र ४९ सूत्र ५० सूत्र ५१ सूत्र ५२ सूत्र ५३ सूत्र ५४ सूत्र ५५ सूत्र ५६ सूत्र ५७ सूत्र ५८ सूत्र ५९ सूत्र ६० सूत्र ६१ सूत्र ६२ सूत्र ६३ सूत्र ६४ सूत्र ६५ सूत्र ६६ सूत्र ६७ सूत्र ६८ सूत्र ६९ सूत्र ७० सूत्र ७१ सूत्र ७२ सूत्र ७३ सूत्र ७४ सूत्र ७५ सूत्र ७६ सूत्र ७७ सूत्र ७८ सूत्र ७९ सूत्र ८० सूत्र ८१ सूत्र ८२ सूत्र ८३ सूत्र ८४ नारदभक्तिसूत्र विवरण श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ६१ नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे. Tags : keshavraj deshamukhnaradtranslationअनुवादकेशवराज देशमुखनारद ॥ लोकहानौ चिंता न कार्या निवेदितात्मलोकवेदत्वात ॥६१॥ Translation - भाषांतर सर्व कर्म ब्रम्हार्पण । जेणें साधिलें आत्मनिवेदन । तेणें ईश्वरकृपा लाधली पूर्ण । नि:संदेह जाणिजे ॥६५६॥लौकिक अथवा वैदिक । कर्में करितांही अचूक । स्पर्शों न शके अभिमान देख । तें ब्रह्मार्पण म्हणावें ॥६५७॥तैसेचि आत्मनिवेदन । म्हणजे अहंकाराचें उच्चाटन । अहंममतेचें निर्मूलन । करून स्वयें राहिला ॥६५८॥जें जें काहीं होतें जातें । तें ईश्वरच्छेनें घडते । निमित्तासी कारण होतें । कर्तृत्व मानवी प्राण्यांचे ॥६५९॥जो या विश्वाचा निर्माणकर्ता । स्वयें धर्ता आणि प्रतिपाळिता । तोचि होय संहारकर्ता । निसर्ग नियमानुसारें ॥६६०॥ऐसें जाणोनि निश्चित । सकल सत्ता तयाची एथ । कांही होतां हित अनह्ति । नये मांगू उद्वेग ॥६६१॥हितानहित झालें । तरी आपुल्या कल्पनेंने ठरविलें । शाश्वत हित तो जाणे भलें । जेणें ब्रह्मांड निर्मिलें ॥६६२॥आपणा आपुली कल्पना । भ्रांतीमाजी घाली मना । लोभ स्वार्थी संकुचितपणा । बुध्दीसी आणी आपुल्या ॥६६३॥जीवपण एकदेशी । ईश्वर व्यापक सर्व देशीं । तेणें योजिल्या कार्यासी । काय दूषण येईल ॥६६४॥परी आपुले बुध्दि विचारितां । जरी भासली सदोषता । तरी व्याकुळ न व्हावें सर्वथा ईश्वरेच्छा मानोनि ॥६६५॥जें जें कांही घडों आलें । तें आपुलिया हितार्थचि भलें । ऐसें जाणोनिया वहिलें । चिंता मनीं न करावी ॥६६६॥लौकिकदृष्टया सुखदु:खात्मक । जरी ओढवले प्रसंग अनेक । तरी निश्चळता मनाची देख । नये देऊं डळमळों ॥६६७॥ईश्वरयोजना कल्याणत्मक । हा निश्चय राखावा निष्टंक । मनाविरुध्द कांही एक । घडलिया खंत न करावी ॥६६८॥ईश्वराचे आधीन सकल । जाणोनि राहावें निश्चळ । बदलतां काळवेळ । सकळ नीट होईल ॥६६९॥मनुष्याचा विचार क्षणिक । तैसेचि मानी सुखदु:ख । ईश्वरयोजना अतिव्यापक । क्षल द्यावें त्यावरी ॥६७०॥तो दीनदयाळ कृपाघन । सर्वांचे शाश्वत कल्याण । मनीं आणूनि उपायसाधन । करीतसे निरपेक्ष ॥६७१॥ N/A References : N/A Last Updated : November 24, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP