म्हणजे गुरुचे पाय धरणें त्याचा प्रकार असा :- अमुक प्रवरांचा असून अमुक गोत्राचा अमुक शर्मा असा मी नमस्कार करतों, असें म्हणून, डाव्या कानाला डाव्या हाताचा व उजव्या कानाला उजव्या हाताचा स्पर्श केल्यावर उजव्या हातानें गुरुचा उजवा पाय व डाव्या हातानें गुरुचा डावा पाय धरुन (त्या दोहोंवर आपलें) मस्तक (बटूनें) टेंकून नमस्कार करावा. याप्रमाणेंच गुरुजन, माता व पिता यांचे अभिवादनपूर्वक पाय धरण्याला उपसंग्रहण असें म्हणतात. वृद्धतरांना अभिवादन (पायांवर डोकें ठेवणें) करुन, वृद्धांना नमस्कार करावा. अशुचि, वमन करणारा, अभ्यङ्ग केलेला, स्नान करीत असलेला, जपादिकांत निमग्न असलेला व फुले, पाणी, भिक्षा वगैरे घेऊन जात असलेला, यांना नमस्कार करुं नये, केल्यांस उपास करावा. अनत्यजाला (नमस्कार) केल्यास कृच्छ्रप्रायश्चित्त करावें आणि देवता, गुरु व संन्यासी यांना नमन न केल्यास उपास करावा.