कुमाराच्या उपनयनंकालीं(सध्यां मुंजीच्या वेळीं) किंवा कन्येच्या लग्नप्रसंगीं बृहस्पति (गुरुग्रह) जर अनुकूल नसेल तर शौनदिकांनीं सांगितलेली शान्ति करावी. (कुमाराच्या मुंजप्रसंगीं)
’अस्य कुमारस्थोपनयने’
(किंवा कन्येच्या लग्नांत)
’अस्थाः कन्यकाया विवाहे’---बृहस्पत्यानुकूल्यसिद्धिद्वारा श्रीपरमेश्वरप्रीत्यर्थं बृहस्पतिशान्तिं करिष्ये’
असा संकल्प करुन आचार्य शोधून पसंत करावा. स्पंडिल वर ईशन्य दिशेला मांडलेल्या श्वेत (पांढर्या) कलशांत पञ्चगव्य, कुशोदक (दर्भाचें पाणी) विष्णुक्रांता (वनस्पति), शतावरी (वनस्पति) वगैरे औषधि टाकून पूर्णपात्राची स्थापना केल्यावर, पिंवळ्या अक्षतांच्या केलेल्या चौकोनी पीठावर गुरुची सुवर्णप्रतिमा मांडावी. स्थंडिलावर अग्निस्थापना वगैरे झाल्यावर बृहस्पतिमश्वत्थसमिज्यसर्पिमिश्ररायसैः साज्येनमिश्रितयवव्रीहितिलेन च प्रतिद्रव्यमष्टात्तरशताहुतिभिः शेषेण स्विष्टकृत’
असें अन्वाधान करावें. आज्यभागापर्येतचें सारें कर्म संपल्यावर, गुरुच्या प्रतिमेची षोडशोपचारें पूजा करावी. पूजेंत---दोन पिंवळीं वस्त्रें, पिंवळें यज्ञोपवीत, पिंवळें चन्दन, पिंवळ्या अक्षता, पिंवळीं फुलें, तुपाचा दिवा आणि दहींभाताचा नैवेद्य हीं (गुरुला) अर्पण केल्यानंतर, माणिक अथवा सानें याचें (ब्राह्मणाला) दान देऊन, ग्रहमखांत सांगितल्याप्रमाणें कुम्भाचें अभिमंत्रण करावें व मग बृहस्पतिमन्वानें दहीं व मध यांत भिजविलेल्या समिधा, तूप, घरात शिजविलेला भात-यवादिकांनीं मिश्रित यांनीं अन्वाधान जसें केलें असेल तसा होम करावा. नन्तर होमशेष सरवून गन्धादिकांनीं बृहस्पतीचे पूजन करावें. पिंवळ्या अक्षता, पिंवळें गन्ध व पिंवळीं फुलें हीं तांब्याच्या भांडयांतल्या पाण्यांत टाकून, त्याचें (गुरुला) अर्घ्य द्यावें. अर्घ्य देतांना
’गम्भीरदृढरुपांग देवेज्य सुमते प्रभो ।
नमस्ते वाक्यते शान्त गृहाणार्घ्यं नमोऽस्तुते ॥’
असा मंत्र म्हणावा व मग
’भक्त्या यत्ते सुराचार्य होमपूजादि सत्कृतम् ।
तत्त्वं गृहाण शान्त्यर्थं बृहस्पते नमोनमः ॥
जीवो बृहस्पतिः सूरिराचार्यो गुरुगङ्गराः ।
वाचस्पतिर्देवमन्त्री शुभं कुर्यात् सदा मम ॥’
या मंत्रांनीं प्रार्थना करावी. देवताविसर्जन व प्रतिमादान हीं केल्यावर कुमारादिकांनीं युक्त अशा यजमानाला जो अभिषेक करावा, त्याचे मंत्र :- ’आपो हिष्ठा० ऋचा ३। तत्त्वायामि० ऋचा ३ । स्वादिष्टया० ऋचा ३ । समुद्रज्येष्ठ० ऋचा ४ । इदमापःप्रवह० ऋचा १ । तामग्निवर्णां० ऋचा १ । या ओषधीः० ऋचा १ । अश्वावतीर्गोमतीर्ना ऋचा १ । यद्दोया देवहेडनं०’ वगैरे कूष्माण्ड मंत्र ’पुनर्यंत्रः पुनरायु०’ येथपर्यंत तैत्तिरीय शाखेंत प्रसिद्ध असलेले (जे मंत्र) कौस्तुभादि ग्रंथांत दिले आहेत (ते पहावे). अभिषेकानंतर ब्राह्मणभोजन करावें अशी ही बृहस्पतीची शान्ति आहे.