रवीचे - गुरु, मंगळ, चंद्र हे मित्र होत. शनि शुक्र हे शत्रु; बुध सम.
चंद्राचे - सूर्य, बुध, मित्र; मंगळ, गुरु, शुक्र, शनि सम; शत्रु कोणी नाही.
मंगळाचा - बुध शत्रु; सूर्य गुरु, चंद्र मित्र, शुक्र, शनि, सम.
बुधाचे - सूर्य, शुक्र मित्र; चंद्र शत्रु, शनि, मंगळ, गुरु सम.
गुरूचे - सूर्य, मंगळ, चंद्र मित्र; शुक्र, बुध शत्रु; शनि सम
शुक्राचे - शनि, बुध मित्र, सूर्य चंद्र शत्रु; मंगळ गुरु सम
शनीचे - शुक्र, बुध मित्र; मंगळ सूर्य, चंद्र शत्रु; गुरु सम. यांच्या गुणांचा विचार वर आणि वधू यांचे राशिस्वामि एक अथवा राशींच्या स्वामींचे परस्पर मित्रत्व असता पाच गुण; राशिस्वामीचे समत्व व शत्रुत्व असाता अर्धा गुण; समत्व व मित्रत्व असता चार गुण; शत्रुत्व व मित्रत्व असता एक गुण; परस्पर समत्व असता तीन गुण; परस्पर शत्रुत्व असेल तर शून्य गुण. याप्रमाणे जाणावे.