महानाम्नी व्रत, महाव्रत, उपनिषदव्रत आणि गोदान व्रत या नावाची चार व्रते आहेत. ती जन्मापासून तेराव्या इत्यादि वर्षाचे ठिकाणी क्रमाने व उत्तरायणांत चौल संस्काराला उक्त अशा, तिथि, नक्षत्र, वार इत्यादिकांचे ठिकाणी करावी. या व्रतसंबंधाचे विस्तृत प्रयोग कौस्तुभ इत्यादि ग्रंथामध्ये व आपल्या गृह्यसूत्रामध्ये पहावे. या व्रतांचा लोप झाला असता प्रत्येकाबद्दल एकेक कृच्छ्र प्रायश्चित्त करून गायत्रीमंत्राने शंभर आहुतींनी हवन करावे. तीन, सहा अथवा बारा कृच्छ्र करावे असे दुसर्या ग्रंथात सांगितले आहे.